Couple Relationship SAAM TV
लाईफस्टाईल

Couple Relationship : नात्यात खरंच पती-पत्नीच्या वयातील अंतर मॅटर करते? जाणून घ्या सुखी संसाराचा मंत्र!

Age Gap Between Husband And Wife : आजकाल आपल्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या व्यक्तीशी लग्न करण्याचे प्रमाण वाढत जात आहे. मात्र नात्यात खरंच पती-पत्नीच्या वयातील अंतर मॅटर करते का? जास्त वयाचा संसारावर काही परिणाम होतो का? जाणून घेऊयात.

Shreya Maskar

कोणतेही नाते टिकवण्यासाठी प्रेम आणि एकमेकांना स्वीकारणे खूप महत्त्वाचे आहे. नवरा- बायकोचे नाते विश्वासावर टिकून असते. तुम्ही वयाने जास्त असलेल्या व्यक्तीशी लग्न केल्यावर सुरुवातीला काही समस्या येत नाही. कालांतराने समस्या उद्भवतात. मानसिक, शारीरिक प्रभाव जाणवतो आणि ताण वाढतो. विचारांच्या मतभेदांमुळे विचारात फरक जाणवतो.

पती-पत्नीच्या वयात किती अंतर असावे?

सर्वांगीण सुखी संसारासाठी पती-पत्नीच्या वयात जास्त फरक नसावा. साधारणपणे १ ते ४ वर्षांचे अंतर नवरा- बायको मध्ये सामान्य मानले जाते. त्याहून पुढे जाऊन तुम्ही जास्तीत जास्त तुमच्या पेक्षा ४ ते ६ वर्षांनी मोठ्या असलेल्या व्यक्तीशी लग्न करू शकता. 'प्रेमाला वयाचे बंधन नसते' हे वाक्य आपण वारंवार ऐकत आलो आहोत. मात्र १० ते १५ वर्षांनी मोठ्या असलेल्या व्यक्तीशी लग्न केल्यास संसारात काही समस्या उद्भवू शकतात. जास्त वय नसलेल्या व्यक्तीशी लग्न केल्यास मानसिक आणि शारीरिक नाते चांगले राहते. तसचे जोडीदार कम्फर्टेबल राहतो आणि नातं जास्त फुलतं. एकमेकांना सांभाळत सर्व जबाबदारी पूर्ण करता येतात.

जास्त वय असल्यास नात्यावर होणारे परिणाम

१ ते ४ वर्षांचे अंतर नवरा-बायकोमध्ये सामन्य मानले जाते. साधारण एका पातळीवर ही लोक असतात. त्यामुळे एकमेकांना चांगले समजून घेतात. यांमध्ये कमी भांडणे आणि गैरसमज होतात. हे वय बायोलॉजिकली सुद्धा योग्य मानले आहे. जर तुमचे जास्त वय असलेल्या व्यक्तीवर प्रेम असेल आणि तुम्ही लग्न केले तर नात्यांत भांडणे कमी होतात. तसेच एकमेकांना समजून घेतले जाते. पण अरेंज मॅरेजमध्ये भांडण होऊन संसार मोडण्याचीही वेळ उद्भवते. कारण दोन काळातील लोक एकत्र संसार करणे ते ही अनोळखी असताना, थोडे कठिण जाते. जास्त वयामध्ये फरक म्हणजे दोघांची विचारसरणी, महत्त्वाकांक्षा आणि ध्येय सर्वच वेगळे ठरते.

डिस्क्लेमर : ही फक्त सामान्य माहिती आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalsubai Fort History: इतिहास, वास्तुकला आणि ट्रेकिंगसाठी खास! वाचा कळसुबाई किल्ल्याचा इतिहास आणि वैशिष्ट्ये

America Shutdown: ट्रम्प यांना जोरदार धक्का; अमेरिकेत शटडाऊन, सरकारी काम ठप्प, पगारावरही संकट

Maharashtra Live News Update: संघाच्या शताब्दी कार्यक्रमात पंतप्रधान मोदींच्या हस्ते टपाल तिकीट आणि नाणं जारी

Veg Pulao: दसऱ्याला चमचमीत खावसं वाटतंय? झटपट करा हा हॉटेल स्टाईल चमचमीत पुलाव

Prakash Ambedkar : ओला दुष्काळ जाहीर करायला वेळ का?; दुष्काळाच्या मुद्द्यावरून प्रकाश आंबेडकरांचा सरकारवर निशाणा

SCROLL FOR NEXT