Color Theory SAAM TV
लाईफस्टाईल

Color Theory : रंग कसे तयार होतात? जाणून घ्या वैज्ञानिक दृष्टिकोन

How To Color Created : आज कोणत्या रंगाचे कपडे घालायचे? हा प्रश्न तुम्हाला रोज पडतो, पण तुम्ही कधी असा विचार केलाय का? की, एवढे रंग कसे तयार होतात? चला तर मग आज जाणून घेऊयात.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रंग आपल्या आयुष्याचा एक भाग असतो. प्रत्येक रंग हा आपल्या भावना दर्शवतो. वास्तविक पाहता माणसाचे जीवन हे कलरफूल आहे. ज्योतिषशास्त्रात सुद्धा रंगाना खूप महत्व दिल जातं. आपल्या दैनंदिन जीवनात, घरी,आजूबाजूला अगदी कपड्यांपासून ते आपल्या घरात असलेल्या वस्तू या विविध रंगानी भरलेल्या असतात.

रंग आपल्या डोळ्यांना कसे दिसतात?

प्रकाश म्हणजे लाईट हा रंगाचा मुख्य स्रोत आहे. सूर्यप्रकाशात सर्व रंगाचा समावेश असतो. जेव्हा हा प्रकाश पाण्याच्या थेंबांमध्ये जातो. तेव्हा इंद्रधनुष्य तयार होते. यात सात रंग असतात. ते म्हणजे जांभळा, तांबडा, नारंगी, हिरवा, पांढरा, निळा, पिवळा. हे रंग आपल्याला वेगवेगळे दिसतात. कारण प्रकाश वेगवेगळ्या वेगाने प्रवास करतो.

रंगाचे विज्ञान

रंगाच्या विज्ञानात सर्वात महत्त्वाचे तत्त्व म्हणजे वर्णक्रम होय. जेव्हा आपण एखाद्या वस्तूवर प्रकाश टाकतो तेव्हा ती वस्तू त्या प्रकाशातला काही रंग शोषून घेते आणि काही रंग रिफ्लेक्ट करते. अशात आपण फक्त रिफ्लेक्ट केलेला रंग पाहतो. उदा. आपल्याला झाडाची पानं हिरवी दिसतात. कारण ती हिरवा रंग रिफ्लेक्ट करतात. आणि बाकीचे रंग शोषून घेतात. जे आपल्याला दिसत नाही. कारण आपल्या डोळ्यात पेशी असतात. जे डोळ्यातील पेशींचे रंग ओळखतात. या पेशींमुळे आपण लाल, हिरवा आणि निळा हे रंग पाहु शकतो. या तीन रंगांना प्राथमिक रंग म्हणतात.

रंगांचे अजून एक मजेदार तथ्य म्हणजे काही प्राण्यांना माणूस पाहू शकत नाही असे रंग दिसतात. उदा. मधमाशी आणि पक्षी हे अल्ट्रावॉयलेट रंग पाहू शकतात. तर पुढच्यावेळी कपड्यांचा किंवा वस्तूचा रंग पाहाल तर लक्षात ठेवा हा फक्त रंग नाही तर प्रकाशाचा खेळ आहे.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : - पहिल्या वर्षापासून हिंदी सक्तीला नागपूरातील तज्ज्ञांचा विरोध

Sangola Bandh : भाजपच्या रॅलीत आमदाराच्या घरावर हल्ला, सोलापूरचे राजकारण तापलं, सांगोला बंदची हाक

Babasaheb Patil: 'शेतकऱ्यांना कर्जमाफीचा नाद लागला'; सहकार मंत्र्यांनी जखमेवर मीठ चोळलं

Third and Fourth Mumbai : तिसरी आणि चौथी मुंबई नेमकी कोणती आणि कशी, कुठपर्यंत असणार?

Jayant Patil vs Padalkar: गोपीचंद पडळकरांना मारणार; जयंत पाटलांची हाणामारीची भाषा

SCROLL FOR NEXT