ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
अलिबाग हे समुद्र किनारा असलेलं ठिकाण आहे. मुंबईपासून १०० किमी अंतरावर असलेलं अलिबाग हे बीच, कनकेश्वर किल्ला यासाठी ओळखले जाते.
गणपतीपुळे हे रत्नागिरी जिल्ह्यातील एक प्रसिद्ध ठिकाण आहे. येथील गणपतीचे देऊळ हे पर्यटनाचे प्रमुख आकर्षण आहे.
अलिबागपासून थोडे पुढे गेल्यास आपल्याला काशीद समुद्रकिनारा लागतो. या परिसरात एक अभयारण्य आणि जंजिरा किल्ला आहे.
दिवेआगर हा जास्त प्रसिद्ध नसलेला समुद्रकिनारा आहे. या ठिकाणी एक्सोटिका बीच रिसॉर्ट, नारळाच्या झुडपात इंद्रधनुष्य कॉटेज अशी हॉटेल्स आहेत.
श्रीवर्धन रायगड जिल्ह्यातील तालुक्याचं ठिकाण आहे. दिघी बंदर श्रीवर्धन तालुक्यात आहे. कोकणातील सात महत्त्वाच्या दीपगृहांपैकी एक दीपगृह येथे आहे.
कोकणपट्टीतील एक निसर्गरम्य असं पवित्र तीर्थस्थान आहे. गर्द हिरवे डोंगर तर दुसऱ्या बाजुला नयनरम्य समुद्रकिनारा आहे.
मुरुडचा समुद्र किनारा हा कोकणपट्टीवरील मोठा समुद्र किनारा आहे. डॉल्फिन या किनार्यावरचं विशेष आकर्षण आहे.
येथे क्लिक करा :