Best Destinations for honeymoon yandex
लाईफस्टाईल

Honeymoon Destinations: हनिमूनला जायचा विचार आहे का? भारतातील 'या' डेस्टिनेशन्स नक्की भेट द्या...

Travel: लग्नानंतर नवविवाहित जोडप्यांना हनिमूनला जायला आवडते. सामान्य जोडपे असोत की सेलिब्रिटी, प्रत्येकजण खास हनिमून डेस्टिनेशनच्या शोधात असतो.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

लग्नानंतर नवविवाहित जोडप्यांना  हनिमूनला जायला आवडते. सामान्य जोडपे असोत की सेलिब्रिटी, प्रत्येकजण खास हनिमून डेस्टिनेशनच्या शोधात असतो. बहुतेक सेलिब्रिटी विदेशी ठिकाणे निवडतात, ज्यात मालदीव, बेट, फिजी, लंडन, जर्मनी यांसारख्या ठिकाणांचा समावेश होतो. मात्र पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर भारतीय पर्यटनाला चांगलीच चालना मिळाली आहे. आता जोडपी डेस्टिनेशन वेडिंग ते हनिमूनसाठी भारतीय पर्यटन स्थळे निवडत आहेत.  अंदमान निकोबारपासून गोव्यापर्यंत आणि काश्मीरपासून अलेप्पीपर्यंत असे अनेक समुद्रकिनारे आणि डोंगराळ ठिकाणे आहेत जी हनिमून डेस्टिनेशन म्हणून नवविवाहित जोडप्यांची पहिली पसंती ठरत आहे.चला तर बघूया ही कोणती ठिकाण आहेत.

१.हॅवलॉक बेट(अंदमान निकोबार)

हनिमून पॅकेजसाठी अंदमान बेटांची निवड करा. भारतीय सेलिब्रिटी अनेकदा मालदीवला भेट देण्यासाठी किंवा सुट्टीचा आनंद घेण्यासाठी तिकडे जातात. मात्र भारतात मालदीवसारखी जागा अंदमान निकोबारमध्ये हॅवलॉक बेट आहे. देशातील अनेक पर्यटन स्थळांमध्ये सर्वाधिक बुक केलेले हनिमून डेस्टिनेशन म्हणजे अंदमान निकोबार.

२. अलेप्पी, केरळ

नैसर्गिक दृश्यांमध्ये शांत आणि सुंदर ठिकाणी रोमँटिक वेळ घालवण्यासाठी जोडपे केरळकडे आकर्षित होतात.  हनिमून डेस्टिनेशन म्हणून केरळमध्ये अलेप्पी हे जोडप्यांची पहिली पसंती ठरते.  येथे शांत पाण्यात खाजगी हाऊसबोटमधून नेत्रदीपक दृश्ये पाहता येतात.  याशिवाय सुंदर चहाच्या बागा आणि हिल स्टेशनमध्ये वेळ घालवण्यासाठी जोडपे मुन्नारची निवड करतात. 

३.काश्मीर 

हनिमून डेस्टिनेशन म्हणून काश्मीर नेहमीच कपल्सची पसंती असते. काश्मीरला पृथ्वीवरील स्वर्ग म्हणतात.  बर्फाळ टेकड्या आणि दल सरोवरात शिकारा राईडचा आनंद लुटत असलेल्या जोडप्यांची छायाचित्रे सोशल मीडियावर अनेकदा पाहायला मिळतात. काश्मीरमधील हनिमून बुकिंगमध्ये यंदा ३.६ टक्क्यांनी वाढ झाली आहे.  काश्मीरमध्ये लोक प्रवासासाठी गुलमर्ग, सोनमर्ग, श्रीनगरसह अनेक ठिकाणी पोहोचतात.

४. गोवा 

गोवा हे अतिशय लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे.  समुद्रकिनाऱ्यांवर जाण्याचा आनंद घेणारे लोक त्यांच्या हनीमूनसाठी गोवा निवडतात. गोव्यात केवळ भारतीयच नाही तर परदेशी लोकही येतात. अनेक सेलिब्रिटींनी तर त्यांच्या डेस्टिनेशन वेडिंगसाठी गोव्याची निवड करतात.

५. हिमाचल प्रदेश 

लग्नानंतर नवविवाहित जोडपे जे हनिमूनला जाण्यासाठी बजेट अनुकूल ठिकाणे शोधत आहेत ते हिमाचल प्रदेशला जाऊ शकता. हिमाचल प्रदेशातील हिल स्टेशन कमी पैशात आणि कमी वेळेत भेट देण्यासाठी खूप लोकप्रिय आहेत.  येथे जोडप्याने शिमला मनाली ते धर्मशाला आणि कुफरीपर्यंत हनिमून पॅकेज बुक करू शकता. 

Edited by - अर्चना चव्हाण

Diwali Padwa: दिवाळीचा आजचा दिवस सोन्यासारखा! पाडव्याच्या मुहूर्तावर या राशींना मिळणार भाग्याची साथ

Thane Tourism : शहराच्या गोंगाटापासून दूर निवांत ठिकाणी घालवा येणारा वीकेंड, बेस्ट लोकेशन आताच नोट करा

HBD Parineeti Chopra : राघव चड्ढाची 'परी' किती कोटींची मालकीण? आकडा वाचून डोळे फिरतील

Jio Recharge Offer: जिओचा नवीन पोस्टपेड प्लॅन धमाका! फक्त 'या' किमतीत ७५ जीबी डेटासह मिळवा प्रीमियम सुविधा

Maharashtra Live News Update: पुण्यात दिवाळी पाडव्याची धूम, सारसबागमध्ये तरुणाईंची गर्दी

SCROLL FOR NEXT