Kuwait Fire News Saam Tv
लाईफस्टाईल

kuwait indian workers : कुवेतमध्ये राहणाऱ्या भारतीयांची संख्या किती? सर्वात जास्त लोक कोणत्या प्रकारची नोकरी करतात?

kuwait indian workers salary : कुवेतमध्ये कामगारांच्या इमारतीला भीषण आग लागली. या आगीत ४१ भारतीयांचा मृत्यू झाला. तसेच तेथील स्थानिकांचाही मृत्यू झाला. या घटनेने कामगारांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

Vishal Gangurde

नवी दिल्ली : कुवेतच्या अहमदी प्रांताच्या मंहफ ब्लॉकच्या एका इमारतीला आग लागून ४० हून अधिक भारतीयांचा मृत्यू झाला. इमारतीला आग लागल्यानंतर अग्निशमन दलाच्या ९० हून अधिक लोकांनी भारतीयांना वाचवलं. कुवेतमध्ये २० टक्क्यांहून अधिक टक्के कामगार भारतातील आहेत.

मीडिया रिपोर्टनुसार, कुवेतमध्ये काम करणाऱ्या भारतीय कामगारांना नागरी सुविधा फार कमी प्रमाणात मिळतात. या कामगारांना कामाप्रमाणे योग्य वेतनही दिलं जात नाही. तसेच त्यांच्या राहणे खाण्याचीही उत्तम सोय नसते. कुवेतमध्ये एका खोलीत १० ते १५ भारतीय कामगारांची राहण्याची सोय केली जाते.

भारतीय कामगारांकडून अधिक काम करून घेतलं जातं. त्या कामाच्या योग्य मोबादलाही दिला जात नसल्याचा आरोप कामगारांचा आहे. भारतीय कामगारांकडून हा आरोप कुवेत सरकार आणि कंपनी मालकांवर केला जातो. कामगारांना राहण्यासाठी एका विशेष विभाग देण्यात आला आहे.

कुवेत भारतीय कामगारांच्या तक्रारी सोडवण्यासाठी भारतीय दुतावासाने तक्रारींचं निवारण करण्यासाठी एका केंद्राची स्थापनाही करण्यात आली आहे. कुवेतमधील भारतीय दुतवासांच्या आकडेवारीनुसार, कुवेतमधील एकूण कामगारांपैकी ३० टक्के जण भारतीय आहेत. कुवेमध्ये एकूण १० लाख भारतीय कामगार राहतात.

मीडिया रिपोर्टनुसार, कुवेतमधील भारतीय कामगार हे ऑइल, गॅस, बांधकाम विभाग, आरोग्य आणि फायनान्स क्षेत्रात काम करतात. कुवेतमध्ये चांगल्या पदावर काम करणारे भारतीय लोक चांगलं जीवन जगतात. कुवेतमध्ये अकुशल कामगार, हेल्पर आणि क्लिनर कामगारांना महिन्याला १०० कुवेत दिनार (२७ हजार रुपये) मिळतात. तर कुशल कामगारांना महिन्याला ३८ ते ४६ हजार रुपये पगार मिळतो.

कुवेतमध्ये मोठ्या पदावर काम करणाऱ्या लोकांना महिन्याला २.७ लाख ते ८ लाख रुपये वेतन मिळतं. मजुरांपेक्षा मोठ्या पदावर काम करणाऱ्यांची आर्थिक स्थिती चांगली आहे. कुवेतमधील आरोग्य व्यवस्था ही भारतीयांच्या टेकूवर उभी आहे. कुवेतमधील रुग्णालयात भारतीय डॉक्टर आणि पॅरामेडकिल लोकांची संख्या अधिक आहे. ५० लाख लोकसंख्या असणाऱ्या देशात १ हजार भारतीय डॉक्टर, ५०० भारतीय डेंटिस्ट डॉक्टर आणि २४ हजार भारतीय नर्स आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chandra Grahan Tips : ग्रहणाच्या वेळी अन्न दूषित होऊ नये यासाठी सोपा उपाय

Anant Chaturdashi 2025 live updates : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मिरवणूक रथात विराजमान

Viral Video: शाळा आहे की मसाज पार्लर! शिक्षकाने विद्यार्थिनींकडून करून घेतली बॉडी मसाज, VIDEO पाहून तुम्हालाही येईल राग

Aayush Komkar: शेवटी सूड घेतलाच! वनराजच्या अंत्यविधीला शस्त्रपूजन करत बदला घेण्याची शपथ, अन् १ वर्षाने आयुष कोमकरची हत्या

Shocking : संतापजनक! मुलाच्या हव्यासापोटी जन्मदात्याने मुलीला संपवलं; बिहार हादरलं

SCROLL FOR NEXT