Kitchen Tips SaamTv
लाईफस्टाईल

Kitchen Hacks : भाजी किंवा आमटीत जास्त तेल झालाय? मग नो टेंशन! वापरा 'या' भन्नाट ट्रीक्स

Tips To Remove Excess Oil From Gravy : दररोजचं जेवण बनवताना कधीतरी भाजीत तेलाचं प्रमाण वाढतं. अशावेळी हे तेल कसं काढवं ते कळत नाही. त्यासाठी खास टिप्स आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत.

Saam Tv

मॉडर्न जीवनशैलीनुसार आता प्रत्येकजण आपल्या आहाराच्या बाबतीत सतर्क झालेला बघायला मिळतो. फिट आणि निरोगी राहण्यासाठी वेगवेगळे डाएट प्लॅन, जेवणात हेल्दी पदार्थांचा समावेश अशा अनेक गोष्टी केल्या जातात. निरोगी शरीर ठेवण्यासाठी व्यायामाबरोबर अनेकदा कमी तेलातले पदार्थ खाण्यावर भर दिला जातो. घरात भाज्या बनवताना देखील आपण कटाक्षाने तेलाचा अतिरिक्त वापर टाळून जेवण बनवण्यावर भर देत असतो.

तेल मीठ तिखट अशा अनेक गोष्टी आपण पदार्थतून कमी करण्याचा आग्रह धरत असतो. मात्र कधीतरी भाजीत किंवा आमटीमध्ये तेल जास्त होतं. मग पंचायत होत असते. हे तेल कसं कमी करावं किंवा त्याचं काय करावं हे आपल्याला कळत नाही. मात्र आता हे वाढवाचं तेल कमी करण्याच्या देखील काही ट्रिक्स आहेत.

यासाठी असलेल्या काही सोप्प्या टिप्स वापरुन तुम्ही भाजीत किंवा आमटीत आलेलं वाढीव तेल आता तुम्ही बाजूला काढू शकतात. विशेष म्हणजे अशाप्रकारे भाजीतील तेल काढल्यावर चविवर देखील कोणताच परिणाम होत नाही. अशाच काही टिप्स आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

उकडलेल्या बटाट्याचा करा वापर

उकडलेले बटाटे घालून भाजीतील तेल कमी करता येते. भाजीमध्ये जास्त तेल असल्यास उकडलेले बटाटे चांगले मॅश करून कोरडे भाजून घ्यावेत. त्यानंतर भाजीत बटाटे घालून ५ मिनिटे उकळा आणि गॅस बंद करा. 5 मिनिटे झाकून ठेवल्यास, बटाटे तेल शोषून घेतात. त्यामुळे भाजीत तेल दिसून येत नाही. भाजीतील अतिरिक्त मीठ कमी करण्यासाठी देखील या पद्धतीचा अवलंब करता येतो.

कॉर्न फ्लॉवरचा वापर ठरतो फायदेशीर

घरात कॉर्न फ्लॉवर उपलब्ध असेल तर एका वाटीत कॉर्न फ्लॉवर आणि पाणी एकत्र करून त्याची एकजीव पेज बनवून घ्यावी. हे मिश्रण मंद आचेवर शिजवावं. त्यानंतर हे शिजवलेलं मिश्रण भाजीत किंवा आमटीत घालावं. यामुळे भाजीतील तेल कमी होण्यास मदत मिळेल. तसंच तुमच्या भाजीची चवदेखील बदलणार नाही.

बर्फाचा वापर

बर्फाचा एक मोठा तुकडा घ्या, तो भाजीच्या तेलात बुडवून बाहेर काढा. यामुळे बर्फावर तेलाचा थर गोठतो. ही युक्ती २-३ वेळा वापरून तेल कमी करता येतं. तुमच्याकडे फार वेळ नसेल तर ही पद्धत घाईच्यावेळी वापरण्यासाठी उपयुक्त ठरते. भाजीत किती तेल आहे त्यावर ही पद्धत किती वेळा वापरायची हे ठरवावं.

टोमॅटो प्यूरी

भाज्यांचे किंवा आमटीचे अतिरिक्त तेल कमी करण्यास टोमॅटो देखील तुम्हाला मदत करु शकतो. यासाठी भाजीचावरचा थर काढून वेगळा करा. आता कढईत टोमॅटोची प्युरी भाजून भाजीमध्ये मिसळा, नंतर भाजी मंद आचेवर २ मिनिटे उकळा. यामुळे तेल लवकर कमी होण्यास मदत होईल. तसंच भाजीची चव देखील यामुळे वाढण्यास मदत होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Farsan Bhaji Recipe: रोज रोज बटाट्याची भाजी खाऊन कंटाळलात? मग झणझणीत फरसाणची रस्सा भाजी खाऊन पाहाच

Pune Land Scam: मोठी बातमी! पुण्यात आणखी एक जमीन घोटाळा, तहसीलदारांसह ९ जणांविरोधात गुन्हा

Maharashtra Live News Update: खगोलशास्त्रातील आणखी एक तारा हरपला

Liver Symptoms On Skin: चेहऱ्यावर डार्क स्पॉट्स दिसतायेत? असू शकतं लिव्हर बिघडल्याच लक्षण, वेळीच व्हा सावध

Rashmika-Vijay Wedding: तारीख ठरली! रश्मिका आणि विजयच्या लग्नाचा बार उडणार; उदयपूरमध्ये होणार शाही विवाह

SCROLL FOR NEXT