Early signs of kidney failure saam tv
लाईफस्टाईल

Early signs of kidney failure : किडनी सडू लागल्यास शरीरातील या अवयवांना येते सूज; चुकूनही दुर्लक्ष करू नका

Swelling Due to Kidney Damage: किडनी आपल्या शरीरातील महत्त्वाचा अवयव असून ती निरोगी राहणं खूप महत्वाचं आहे. त्यामुळे शरीराच्या काही भागांमध्ये सूज दिसल्यास ते किडनी निकामी होण्याचं लक्षण असू शकतं.

Surabhi Jayashree Jagdish

किडनी हा आपल्या शरीराचा एक महत्त्वाचा भाग आहे. किडनीचं कार्य हे रक्त फिल्टर करून शरीरातील विषारी पदार्थ आणि टाकाऊ द्रवपदार्थ काढून टाकण्याचं असतं. म्हणून, किडनी निरोगी राहणं खूप महत्वाचं असल्याचं तज्ज्ञ सांगतात. परंतु खाण्याच्या चुकीच्या सवयी आणि जीवनशैलीमुळे आजकाल किडनी सडण्याच्या किंवा खराब होण्याच्या तक्रारी जाणवू लागल्या आहेत.

ज्यावेळी किडनीच्या आजारांशी संबंधित लक्षणांकडे लक्ष दिलं जात नाही, तेव्हा किडनीच्या नुकसानाचा धोका वाढतो. मुळात जेव्हा किडनी खराब होते किंवा सडू लागते त्यावेळी तेव्हा शरीरात अनेक लक्षणं दिसू लागतात. त्यापैकी एक म्हणजे सूज. ज्यावेळी किडनी खराब होते तेव्हा काही अवयवांवर सूज येण्याचा धोका असतो.

शरीरातील काही भागांवर सूज का येते?

जेव्हा किडनी खराब होतात तेव्हा त्याची कार्यक्षमता कमकुवत होते. किडनी योग्यरित्या कार्य करू शकत नाहीत. अशा परिस्थितीत, खराब झालेल्या किडनीमुळे शरीरातील अतिरिक्त द्रव आणि सोडियम शरीराबाहेर जाऊ शकत नाही. यामुळे शरीरात द्रव जमा होतो आणि सूज येण्याचा धोका वाढतो.

किडनी खराब झाल्यावर या अवयवांना येते सूज

पाय आणि घोट्यांमध्ये सूज येणं

जेव्हा किडनी सडू लागते तेव्हा पाय आणि घोट्यांवर सूज येऊ लागते. जर तुम्हाला तुमच्या पायांवर आणि घोट्यांवर सूज दिसत असेल तर तुमच्या किडनीची तपासणी नक्की करा. पाय आणि घोट्यांवर सूज येणं हे मूत्रपिंड निकामी होण्याचं लक्षण आहे.

चेहऱ्यावर सूज

चेहऱ्यावर सूज येण हे किडनी निकामी झाल्याचं लक्षण मानलं जातं . किडनी खराब झाल्यावर चेहऱ्यावर सूज येण्याची शक्यता असते. यामध्ये खासकरून डोळ्यांखाली सूज जास्त दिसून येते.

हातांवर सूज येणं

किडनीच्या आजारांमुळेही हातांना सूज येण्याचा धोका असतो. जर तुमचे हात सुजत असतील तर या लक्षणाकडे दुर्लक्ष करू नये. हातांना सूज येणं हे किडनीच्या आजाराचं लक्षण असू शकतं. त्यामुळे वेळीच डॉक्टरांशी संवाद साधणं फायद्याचं ठरेल.

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mobile Recharge: सरकार भरणार मोबाईलचं बिल? केंद्र सरकारची मोफत रिचार्ज योजना?

हनी ट्रॅपची इनसाईड स्टोरी, हनी ट्रॅपसाठी महिलेने कसा रचला सापळा?

Kolhapur News: 'महादेवी'साठी ग्रामस्थ आक्रमक, वनतारामध्ये 'महादेवी'ला नेण्यास विरोध

EVM Recounting: 8 महिन्यानंतर खडकवासल्यात फेरमतमोजणी, VVPAT मधील व्होटर स्लिप गहाळ ?

Crime News: मुंबईच्या २४ वर्षीय महिलेवर दुबईत सामूहिक बलात्कार; ५ सहकाऱ्यांच्या वासनेची बळी पडली

SCROLL FOR NEXT