Dal Bati Recipe Saam TV
लाईफस्टाईल

Dal Bati Recipe : खान्देशी डाळ बट्टी रेसिपी, एकदा खाऊन तर पाहा; १५ मिनिटांत तयार होणारी सिंपल रेसिपी

Khandeshi Dal Bati Recipe : डाळ बट्टी असा पदार्थ आहे जो प्रत्येक व्यक्तीला खावासा वाटतो. मात्र काही व्यक्तींना याची परफेक्ट रेसिपी काय आहे हे माहिती नाही. त्यामुळे आज याची रेसिपी जाणून घेणार आहोत.

Ruchika Jadhav

आपल्या जिभेला नेहमीच वेगवेगळे आणि चमचमीत पदार्थ चाखावेसे वाटतात. प्रत्येक ठिकाणची एक वेगळी खास रेसिपी आणि खास डिश असते. अशात आज आपण खान्देशी स्टाइल डाल बट्टी कशी बनवायची याची रेसिपी पाहणार आहोत. ही रेसिपी जास्त कठीण वाटत असली तरी ती अगदी सिंपल आणि सोपी आहे. त्यासाठी साहित्य योग्य प्रमाणात घेणे आवश्यक आहे. चला तर मग खान्देशी डाल बेट्टीची परफेक्ट रेसिपी जाणून घेऊ.

साहित्य

गव्हाचं पीठ - २ वाटी

बारीक रवा - अर्धी वाटी

दही - ३ चमचे

हळद - १ चमचा

सोडा- अर्धा चमचा

ओवा - १ चमचा

कृती

सर्वात आधी एका वाटीत गव्हाचं पीठ काढून घ्या. या पिठात बारीक रवा मिक्स करा. बारीक रवा मिक्स केल्यावर यामध्ये दही मिक्स करून घ्या. दह्यासह यात हळद आणि सोडा तसेच ओवा सुद्धा मिक्स करा. या पिठाची कणीक मळण्यासाठी यात तूप किंवा तेल तुम्ही घेऊ शकता. तुपाचा वापर केल्याने बट्टी आणखी खुसखुशीत लागते.

आता बट्टी बनवण्यासाठी या पिठात अगदी थोडं थोडं पाणी घ्या. पाण्याचा हात घेऊन कणीक मळा. कणीक मळताना एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्हाला कणीक जास्त पातळ करायची नाहीये. कणीक घट्ट राहील अशाच पद्धतीने पीठ मळून घ्या. पीठ मळून झालं की, १० ते १५ मिनिटे हे पीठ असेच झाकून ठेवा आणि नंतर त्यात सोडा टाकून पीठ पुन्हा मळून घ्या.

तयार कणीकचे बारीक गोळे करून घ्या. हे गोळे हातावर थोडे चपटे करून घ्या. त्यानंतर एका इडलीच्या भांड्यात किंवा दुसऱ्या एखाद्या भांड्यात सर्व गोळे शिजवून घ्या. पीठ मस्त शिजलं की ते एका भांड्यात काढून थंड करून घ्या. थंड झालेल्या पिठाचे सुरीच्या सहाय्याने बारीक काप करून घ्या. त्यानंतर हे तुकडे तेलात मस्त तळून घ्या. तळलेले तुकडे तुम्ही डाळीसह खाऊ शकता.

डाळ बट्टी ही खान्देशमधील एक प्रसिद्ध रेसिपी आहे. हा पदार्थ प्रत्येक व्यक्तीला आवडतोच. डाळीमध्ये तळलेल्या बट्टी टाकल्याने या डाळीची चव फारच मस्त लागते. या रेसिपीसाठी तयार केली जाणारी डाळ सुद्धा अगदी सिंपल पद्धतीने बनवावी. त्यासाठी तुरीच्या डाळीला खमंग आणि तिखट फोडणी द्या. त्यात बट्टी चुरून खायला फार रुचकर लागते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nandgaon Accident: महादेवाचं दर्शन घेऊन परताना अपघात; ट्रॅक्टर ट्रॉली २०० फूट खोल दरीत कोसळली

Vice President Election: सी.पी. राधाकृष्णन कोण आहेत? जाणून घ्या राधाकृष्णन यांचा राजकीय प्रवास

Amol Kolhe :...म्हणून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतोय; खासदार अमोल कोल्हेंचा भाजपवर जोरदार प्रहार

Jalna Accident: ट्रकच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर; भीषण अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू

Voter Fraud : खोपोलीतही मतदार याद्यांमध्ये घोळ, 140 मतदारांची नावं यादीत दोन वेळा

SCROLL FOR NEXT