ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
जाड रवा, जिरे, मोहरी, हिंग, तेल, कांदे, गाजर, वाटाणा, हिरव्या मिरच्या, टोमॅटो, कढीपत्ता, कोथिंबीर, मीठ.
सर्वप्रथम गॅसवर कढई ठेऊन त्यामध्ये रवा चांगला सोनेरी होईपर्यंत भाजून घ्या. त्यानंतर अका कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये, जिरे, मोहरी, हिंग, हिरव्या मिरच्या आणि कढीपत्त्याची फोडणी तयार करा.
फोडणीमध्ये चिरलेला कांदा मिक्स करुन सोनेरी रंग होईपर्यंत भाजून घ्या त्यासोबतच त्यामध्ये गाजर, वाटाणा देखील फ्राय करुन घ्या.
कांदा आणि भाज्या चांगल्या फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये टोमॅटो मिक्स करुन सर्व मिश्रण एकत्र मिक्स करुन घ्या.
त्यानंतर त्यामध्ये चविनुसार मीठ आणि भाजलेला रवा मिक्स करून त्यामध्ये पाणी मिक्स करा.
मिश्रण एकत्र मिक्स केल्यावर त्यामध्ये पाणी घाला आणि ५ ते ७ मिनिटे झाकण लावून रवा मऊ होऊ द्या.
त्यानंतर वरून कोथिंबीर गार्निश करा. तुमचा अगदी सोप्या पद्धतीनं घरच्याघरी वेजिटेबल उपमा तयार आहे.