Vishal Gangurde
खान्देशात वरण बट्टी हा जेवणाचा पदार्थ खूप प्रसिद्ध आहे.
वरण बट्टी बनवण्यासाठी गहू आणि मक्याचे जाडसर दळलेले पीठ, मीठ,हळद,इनो सोडा,ओवा,तेल हे एकजीव करून घ्यावे. त्यानंतर पाणी टाकून भिजवून घेणे.
पुढे त्याला कणकेसारखेच भिजवा. त्याचे लांब गोलाकार गोळे करून घेणे.
कूकरच्या भांड्याला तेल लावून पुढे बट्ट्या ठेवा, त्यानंतर त्या बट्ट्या प्रमाणात शिट्या देऊन शिजवून घ्या.
कुकर थंड झाल्यावर बट्ट्या काढून घ्या
बट्ट्या काढल्यानंतर त्याच्या गोल गोल चकत्या कापून घ्या.
बट्ट्याच्या चकत्या तेलात खरपूस तळून घ्या.
बट्ट्यासोबत तुरीच्या डाळीचे वरण आणि वांग्याच्या घोटलेल्या भाजीसोबत या जेवणाचा आस्वाद घ्या.