How to care washing machine in marathi, Washing machine tips in Marathi, easy laundry tips
How to care washing machine in marathi, Washing machine tips in Marathi, easy laundry tips ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुताना या गोष्टी लक्षात ठेवा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : आजच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येकाकडे वेळ (Time) कमी असतो. हल्ली कपडे धुण्यासाठी वॉशिंग मशिनचा वापर जवळपास प्रत्येक घरात दिसून येते. सध्या बाजारात ऑटोमॅटिक आणि सेमी ऑटोमॅटिक असे वॉशिंग मशिनचे दोन प्रकार उपलब्ध आहेत. परंतु, कपडे धुताना बऱ्याच वेळा कपडे व्यवस्थित साफ (Clean) होत नाही. कपड्यांचा रंग जातो तर काही वेळा इतर कपड्यांना देखील त्याचा रंग लागतो. त्यामुळे त्यांच्यासोबत धुतलेले इतर कपडेही खराब होतात. (Washing machine tips in Marathi)

हे देखील पहा -

वॉशिंग मशिनमध्ये कपडे धुताना या गोष्टी लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.

- वॉशिंग मशिनमध्ये कपडे धुताना वेगवेगळ्या प्रकारचे कपडे वेगळे करा. जास्त घाण असलेले कपडे, रंगवलेले कपडे, पांढरे कपडे आणि कमी घाण असणारे कपडे. तसेच लोकरीचे आणि सुती कपडे देखील वेगळे केले पाहिजेत. शक्यतो टॉवेल आणि नाईट सूट स्वतंत्रपणे धुवा. वेगवेगळ्या प्रकारचे कपडे वेगवेगळे धुतल्याने ते लवकर खराब होत नाहीत.

- जास्त डिटर्जंट टाकून कपडे धुवू नका. असे केल्यास डिटर्जंट कपड्यांमधून निघत नाही, त्यामुळे कपडे खराब होऊ लागतात.

- आजकाल कपडे धुण्याची पद्धत कपड्यांवर लिहिली जाते. त्यामुळे मशीनमध्ये (Machine) ज्या कपड्यांवर फक्त ड्राय क्लीन लिहिलेले असेल ते धुण्यास विसरू नका. असे केल्याने त्या कपड्यांचे नुकसान होऊ शकते. त्याऐवजी, असे कपडे हाताने धुवा आणि स्पिनरच्या मदतीने ते वाळवा.

- वॉशिंग मशिनमध्ये कोणतेही नवीन कापडे टाकण्यापूर्वी त्या कपड्याचा रंग बाहेर येत नाही ना याची खात्री करा. कपड्यांचा रंग निघत असेल तर ते इतर कपड्यांबरोबर धुतल्यास खराब होतील.

- अनेकदा आपण घाईघाईने मशीनमध्ये झिप केलेले कपडे टाकतो, पण असे केल्याने मशीनसोबतच इतर कपड्यांचेही नुकसान होऊ शकते. त्यामुळे नेहमी झिप बंद करून झिप केलेले कपडे मशीनमध्ये ठेवा. याशिवाय ते इतर कपड्यांपासून वेगळेही धुता येतात.

अशाप्रकारे तुम्ही वॉशिंग मशिनमध्ये कपडे धुवून त्यांची काळजी घेऊ शकतो.

Edited By - Komal Damudre

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: मस्ती केली, चांगलीच जिरली! भररस्त्यात तरुण खुर्ची टाकून बसला; पुढं जे घडलं ते... धक्कादायक VIDEO

शिर्डीतील साईनाथ रुग्णालयात डायलिसिस सुविधा मिळणार मोफत, साई भक्ताकडून 24 लाखाच्या मशीनची देणगी

Today's Marathi News Live : नरेंद्र मोदींची पुण्यात सभा, अमित ठाकरे सभेसाठी रवाना

Mumbai Local News Today: लोकलचा डबा रुळावरुन घसरला! कुठे? कधी? कसा? हार्बर लाईनने प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी

PM मोदींच्या सभेने काही फरक पडणार नाही, कोल्हापुरकरांचा निर्णय पक्का; मालोजीराजे छत्रपतींना विश्वास, Video

SCROLL FOR NEXT