How To Plan Kedarnath Yatra Kedarnath Yatra Guide Saam tv
लाईफस्टाईल

Kedarnath Yatra Travel Guide: केदानाथला जाणे झाले सोपे ! बजेटमध्ये कसा करता येईल प्रवास? जाणून घ्या सविस्तर

Kedarnath Yatra Booking: आता केदारनाथला जाणे अगदी सोपे व कमी खर्चात होणार आहे.

कोमल दामुद्रे

Kedarnath Yatra Guide in Marathi

आपल्या प्रत्येकाला कामाच्या व्यस्त वेळेतून कुठे ना कुठे तरी फिरायला जायचे असते. IRCTC ने चारधाम यात्रा करणाऱ्यासाठी खास ऑफर आणली आहे. आता केदारनाथला जाणे अगदी सोपे व कमी खर्चात होणार आहे.

उत्तराखंडातील केदारनाथचे दार उघडले असून लाखो भाविक शंकाराचे दर्शन घेण्यासाठी येथे जातात. चारधामपैंकी एक असलेल्या बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्रीला भेट देण्यासाठी दरवर्षी लोक लांबून येतात. असे म्हटले जाते केदारनाथला (Kedarnath) भेट देण्यासाठी हा काळ योग्य असतो. कसे जाल ? बुकिंग कशी कराल ? जाणून घेऊया सविस्तर

1. किती दिवसांचा प्रवास (Travel) ?

आता केदारनाथला आपण विकेंडला जाऊ शकतो. या यात्रेसाठी आपल्याला ३ ते ४ दिवसांचा वेळ हवा. आपण इथे जाताना गौरीकुंडाला भेट देण्यासाठी रस्त्याने किंवा रेल्वेने प्रवास करु शकतो. तसेच १५ ते १८ तास चढून जाण्याऐवजी हेलिकॉप्टरचीही सुविधा आहे.

2. कसे जाल ?

केदारनाथला जाण्यासाठी आपण दिल्ली, हरिद्वार किंवा डेहराडूनकडून रेल्वे, बस किंवा विमानाचे तिकीट बुक करु शकता. दिल्ली ते केदारनाथचे अंतर अंदाजे ४६६ किलोमीटर आहे. केदारनाथला जाण्यासाठी थेट रेल्वेची सुविधा नाही. कमी पैशांत ट्रेनने (Train) पोहोचू शकता. दिल्लीहून केदारनाथला पोहोचण्यासाठी पूर्ण दिवस लागू शकतो.

3. खर्च किती येतो ?

केदारनाथ धामला भेट देण्यासाठी दिल्ली ते डेहराडून ट्रेन किंवा बस तिकिटासाठी 300 ते 1000 रुपये खर्च येईल. डेहराडून ते गौरीकुंड बसने प्रवास केला तर 300 ते 500 रुपये साधारण लागतात. दिल्लीहून गौरीकुंडपर्यंत थेट बस सेवा उपलब्ध आहे, ज्याचे भाडे ५००-१००० रुपये आहे. जर तुम्ही हेली सेवा घेत असाल तर सिरसी ते प्रति व्यक्ती राउंड ट्रिप तिकीट रु.5498, फाटा ते केदारनाथ धाम तिकीट रु.5500 आणि गुप्तकाशी रु.7740 असेल. हेलिकॉप्टर सेवा बजेटबाहेर असेल तर गौरीकुंड ते केदारनाथपर्यंत पालखी, घोडाही बुक करता येतो.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: झिशान सिद्दीकी यांचा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

Gevrai Assembly Constituency : ना मविआ ना महाविकास आघाडी; लक्ष्मण पवारांचं ठरलं, अपक्षमधून लढणार

Post Office Scheme : फक्त व्याजातून २ लाख रुपये, पोस्ट ऑफिसची ही योजना नक्की आहे तरी काय?

Maharashtra Assembly Election : खासदार वडिलांपेक्षा मुलाची संपत्ती तिप्पट, विलास भुमरेंकडे ३३ कोटींपेक्षा जास्त संपत्ती!

Chhagan Bhujbal Net Worth: संपत्तीत ८२ लाखांची वाढ, डोक्यावर ४४ लाखांचे कर्ज; छगन भुजबळांची संपत्ती किती?

SCROLL FOR NEXT