Jyeshtha Gauri Avahan Saam Tv
लाईफस्टाईल

Jyeshtha Gauri Avahan : आली गौराई अंगणी..., ज्येष्ठागौरी आवाहन कधी? मुहूर्त, पूजा विधी आणि महत्त्व जाणून घ्या

Jyeshtha Gauri Tithi : भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील षष्ठीला ज्येष्ठागौरी आवाहन केले जाते.

कोमल दामुद्रे

Jyeshtha Gauri Avahan Tithi And Puja vidhi :

भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील षष्ठीला ज्येष्ठागौरी आवाहन केले जाते. गौरीला आदीशक्तीचे रुप मानले जाते. गौरीगणपतीचा सण हा महाराष्ट्रात अगदी मोठ्या भक्तीभावात आणि उत्साहात साजरा केला जातो.

गणपतीच्या काळात गौरीला विशेष महत्त्व आहे. महाराष्ट्रातील विविध भागात, विविध पद्धतीने तिचे पूजन केले जाते. अनुराधा नक्षत्रात गौरी आवाहन केले जाते. या दिवशी ती एकटी नाही तर दोघी बहिणी येतात. ज्येष्ठा आणि कनिष्ठा गौरी या नावाने त्यांना ओळखले जाते. गौरीला गणपतीची आई अर्थात पार्वतीची म्हणून ओळखले जाते तर दुसरी ही माता लक्ष्मी थोरली बहिण मानली जाते. काही भागात यादिवशी महालक्ष्मी पूजा केली जाते. जाणून घेऊया मुहूर्त पूजा विधी

1. गौरी आवाहन शुभ मुहूर्त

२१ सप्टेंबर रोजी दुपारी १४. १६ मिनिटांनी सप्तमी सुरु होईल. त्यानंतर दुपारी ३.३५ मिनिटांपर्यंत गौरीचे आगमन घरोघरी होईल.

2. गौरी पूजन तिथी

ज्येष्ठागौरी पूजनचा शुभ मुहूर्त (Muhurt) दुपारी १२ च्या आधी करुन गौरीला नैवेद्य काही भागात गोडाचा नैवेद्य (Naivedya) दाखवला जातो तर काही भागात तिखटाचा नैवेद्यही केला जातो.

3. गौरी विसर्जन

षष्ठीलाच्या दिवशी गौराईचे आगमन होऊन सप्तमीला ती माहेराचं सुख उपभोगते तर अष्टमीच्या दिवशी तिचे विधीपूर्वक विसर्जन केले जाते. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

4. गौराईचे पूजन कसे कराल?

प्रत्येत भागात गौरीचे (Gauri) वेगवेगळ्या पद्धतीने पूजा केली जाते. यामध्ये धातूची, मातीची प्रतिमा किंवा कागदावर गौरीचे चित्र काढून तर काही ठिकाणी नदीकाठचे पाच लहान खडे आणून गौरीचे पूजन केले जाते. काही ठिकाणी सुगंधीत फुले असणाऱ्या वनस्पतीची रोपे अथवा तेरड्याची रोपे एकत्र बांधून त्यांची प्रतिमा तयार करतात आणि त्यावर मातीचा मुखवटा चढवतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Air Purifying Plants: प्रदूषणाने त्रस्त आहात? तर घरात लावा ही 5 झाडे, हवा राहील शुद्ध

Maharashtra Live News Update: पिंपरी चिंचवड – चाकण वाहतूक कोंडी मोर्चा

Indian Railway: रेल्वेचं RailOne अ‍ॅप लाँच! तिकीट बुकिंगपासून ते ट्रेन ट्रॅकिंग सर्वकाही एका क्लिकवर

Deepika Padukone: 'एवढ्या प्रेमाने भारताला प्रमोट केलं असतं...'; हिजाब परिधान केल्यामुळे दीपिका पदुकोण ट्रोल,नेमकं प्रकरण काय?

Mumbai Traffic : BKC मधील प्रवास महागणार! ५० मिनिटांत बाहेर न पडल्यास ‘कंजेशन फी’ आकारली जाणार

SCROLL FOR NEXT