cold air from AC causes joint stiffness freepik
लाईफस्टाईल

AC and Joint Pain : एअर कंडिशनिंगची (AC) हवा ठरू शकते सांधे दुखीचे कारण, जाणून घ्या

Air Conditioning Side Effects : एअर कंडिशनिंगची थंड हवा शरीरातील सांधे व स्नायूंवर परिणाम करू शकते. त्यामुळे सांधेदुखी, स्नायू आखडणे अशा समस्या उद्भवण्याची शक्यता असते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आजकाल ऑफिसमध्ये काम करणाऱ्या लोकांना सांधे व स्नायू दुखीच्या समस्या जास्त प्रमाणात जाणवतात. शक्यतो जास्तीत जास्तवेळ एका ठिकाणी बसून किंवा सांध्यांची हालचाल न झाल्यामुळे अशा समस्या उद्भवतात. पण तुम्हाला माहीत आहे का? अतिप्रमाणात घेतलेली एअर कंडिशनिंगची (AC) हवा देखील यामागचे मोठे कारण असू शकते. ऑफिसमध्ये एअर कंडिशनिंगच्या हवेचे तापमान उपकरणांच्या सोयीप्रमाणे नियंत्रित केलं जातं. पण हे तापमान मानवी शरीरासाठी धोकादायक ठरू शकतं.

ऑफिसमध्ये किंवा मोठ्या कारखान्यांमध्ये अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणे असतात. गरम हवेमुळे या उपकरणांचे इंटरनेट टेम्प्रेचर वाढतं. ज्यामुळे ते अचानक बंद पडतात किंवा अतिप्रमाणात गरम होऊन स्फोट होण्याची शक्यता असते. म्हणून एअर कंडिशनिंगच्या (AC) हवेचे तापमान खुपच कमी ठेवलं जातं. शिवाय अनेक घरांमध्ये देखील थंडाव्यासाठी एअर कंडिशनिंगचा वापर केला जातो. एअर कंडिशनिंगची हवा आपल्याला आरामदायक थंडावा तर देतेच. त्याचसोबत सांधे व स्नायूंचे दुखणेही देते. आपल्या शरीराला अतिप्रमाणात थंडावा मिळाला तर, रक्ताभिसरण कमी होतं. यामुळे सांधे आखडतात आणि दुखायला लागतात.

शिवाय ऑफिसमध्ये तासन् तास एकाच ठिकाणी बसून काम करायचे असते अशावेळी स्नायूंची हालचाल होत नाही. स्नायूंची लवचिकता कमी होते आणि ताठरपणा येऊन दुखणे सुरू होतं. तसेच आपले शरीर जास्तवेळ थंड वातावरणात राहील्यामुळे शरीरातील ऊर्जेचे प्रमाण कमी होतं. यामुळे सुस्ती आणि थकवा येतो. ज्यांना आधीपासून सांध्यांच्या समस्या आहेत त्यांनी अधिक थंड वातावरणात राहील्यास समस्या जास्त वाढू शकतात.

ऑफिसमध्ये एअर कंडिशनिंच्या थंड वातावरणात बसून काम करण्याशिवाय पर्याय नसतो. यावर उपाय म्हणून तुम्ही अधूनमधून थंड वातावरणातून बाहेर जा. शरीराला थंड हवेपासून वाचवण्यासाठी शाल किंवा स्वेटरचा वापर करा. गरम पाणी प्या, ज्यामुळे रक्ताभिसरण सुधारेल व सांधे दुखीला आराम मिळेल. एकाच ठिकाणी न बसता अर्ध्या-एका तासाने शरीराची हालचाल करा. यामुळे सांध्यांमधील लवचिकता टिकून राहील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पंढरपूरात अतिवृष्टीचा अंदाज, सीना नदीला पुन्हा पुराचा धोका; नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Maharashtra Rainfall: नागरिकांनो सतर्क राहा! आजपासून पाऊस पुन्हा जोर धरणार, कोकण- विदर्भ अन् मराठवाड्यात जोरदार बॅटिंग

Anganwadi Workers: अंगणवाडी सेविकांची दिवाळी गोड होणार! सरकारकडून भाऊबीज गिफ्ट; २००० रुपये मिळणार

Jio New Recharge Plan: भन्नाट ऑफर! १०० रुपयांत मिळणार हजारो रुपयांचे फायदे; डेटा, मनोरंजन आणि अतिरिक्त ऑफर्स फ्री

Success Story: सरकारी नोकरी सोडली, UPSC परीक्षेत दोनदा फेल, जिद्द नाही सोडली, तिसऱ्या प्रयत्नात IAS; सर्जना यादव यांचा प्रवास

SCROLL FOR NEXT