
Know how your blood type can cause a serious illness: आजकालच्या धावपळीच्या जीवनात वातावरणातील प्रदुषण वाढीमुळे बरेच आजार उद्धभवत आहेत. त्यामुळे आरोग्याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. अशात कोरोना सारख्या महामारी नंतर प्रत्येक जण आरोग्याची काळजी घेत आहेत. काहीजण दरमहिन्याला रेग्युलर बॉडी चेकअप करत असतात. पण तुम्हाला हे माहीत आहे का?....की तुमचा ब्लड ग्रूप एका मोठ्या आजाराचे कारण ठरू शकतं....जाणून घेऊया नेमके कारण.....
Your blood type may be the cause of stomach cancer: काही आजार असे असतात ज्यांची लक्षणे शरीरावर फारशी दिसत नाहीत, म्हणून आजार ओळखायला उशीर होतो. आणि तो आजार शरीराच्या आतून हळूहळू पसरून गंभीर परिणाम करू शकतो. म्हणूनच आपण जेव्हा डॉक्टरकडे जातो तेव्हा सर्वातआधी आपल्याला रक्त तपासणीचा सल्ला दिला जातो. यामुळे डॉक्टर अचूक निरीक्षणातून वेळेवर योग्य तो उपचार करू शकतात. पण काही ब्लड ग्रूप असे आहेत जे पोटाच्या कॅन्सरसारख्या गंभीर आजारांना बळी पडू शकतात.
बीएमसी कॅन्सरने २०१९ मध्ये पब्लिश केलेल्या रिपोर्ट नूसार, ए किंवा एबी टाईप ब्लड ग्रूप असणाऱ्या लोकांना पोटाच्या कॅन्सरचा धोका जास्त प्रमाणात असतो. शिवाय एका स्टडीमधून असेही समोर आले आहे कि, ओ ब्लड ग्रूपच्या तुलनेत ए ब्लड ग्रूप असणाऱ्या लोकांना पोटाच्या कॅन्सरचा धोका १३% पेक्षा जास्त असतो. तर एबी ब्लड ग्रूप असणाऱ्या लोकांसाठी हा धोका १८% वाढतो. स्टडीचे काही रिझल्ट्स असेही आले ज्यात ब्लड ग्रूप ए ला पोटाच्या कॅन्सरचा धोका १९% पेक्षा जास्त असतो. तर एबी ब्लड ग्रूप असणाऱ्या लोकांसाठी हा धोका ९% जास्त आहे.
काय आहेत पोटाच्या कॅन्सरची लक्षणे :
१. अपचन आणि पोटात दुखणे
२. भुक न लागणे
३. मळमळणे, उलटी होणे
४. पोट फुगणे
५. वजन कमी होणे
६. थकवा व रक्ताची उलटी
७. पोटात गाठ किंवा सूज येणे
: जर तुम्हालाही यातील कोणतेही लक्षण जाणवत असेलल तर उशीर न करता तुमच्या डॉक्टरचा सल्ला घ्या.
टीप: वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.