Indian Coast Guard Recruitment: इंडियन कोस्ट गार्डमध्ये नोकरीची संधी; खलाशी आणि यांत्रिक पदासाठी भरती; जाणून घ्या कोण करू शकतो अर्ज?
Indian Coast Guard Job Opportunity Google
लाईफस्टाईल

Indian Coast Guard Recruitment: इंडियन कोस्ट गार्डमध्ये नोकरीची संधी; खलाशी आणि यांत्रिक पदासाठी भरती; जाणून घ्या कोण करू शकतो अर्ज?

Bharat Jadhav

तुम्ही भारतीय तटरक्षक दलात नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. इंडियन कोस्ट गार्ड (ICG) ने खलाशी आणि मेकॅनिकल पदांच्या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज मागवलेत. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झालीय. या भरतीसाठी अर्ज केलेले सर्व इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात. इच्छुक आणि पात्र उमेदवार या पदांसाठी 0३ जुलै २०२४ रोजी किंवा त्यापूर्वी अर्ज करू शकतात.

किती पदांची भरती करायची आहे?

या भरती मोहिमेअंतर्गत खलाशी (जनरल ड्युटी) आणि मेकॅनिकल अशा एकूण ३२० पदे भरण्यात येणार आहेत. यामध्ये २६० खलाशी आणि ६० यांत्रिक पदांचा समावेश आहे.

खलाशी (सामान्य कर्तव्य): शालेय शिक्षण परिषद (COBSE) द्वारे मान्यताप्राप्त शिक्षण मंडळातून गणित आणि भौतिकशास्त्रासह इयत्ता १२ वी उत्तीर्ण,असणं आवश्यक आहे.

पदांच्या शैक्षणिक पात्रतेच्या तपशिलांसाठी सुचना देण्यात आलीय. संबंधित विषयांवरील अधिक तपशीलांसाठी, उमेदवार अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात.

वयोमर्यादा:

किमान १८ वर्षे आणि कमाल २२ वर्षे. उमेदवारांचा जन्म ०१ मार्च २००३ ते २८ फेब्रुवारी २००७ (दोन्ही तारखांसह) दरम्यान झालेला असावा.

किती पगार मिळेल?

खलाशी (सामान्य कर्तव्य) – मूळ वेतन रु. २१७०० /- (पगार पातळी ३)

मेकॅनिकल – मूळ वेतन रु. रु. २९२००/- (पगार पातळी ५).

मूळ वेतनाशिवाय इतर अनेक भत्तेही मिळत असतात.

अर्ज कसा करायचा

प्रथम अधिकृत वेबसाइट https://joinindiancoastguard.cdac.in/cgept/ भेट द्या

यानंतर होमपेजवर ICG Recruitment 2024 लिंकवर क्लिक करा.

यानंतर आवश्यक तपशील द्या.

त्यानंतर अर्ज सबमिट करा.

यानंतर आवश्यक कागदपत्रे जमा करा.

शेवटी, भविष्यातील संदर्भासाठी त्याची प्रिंटआउट तुमच्याकडे ठेवा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Latur Accident News: हृदयद्रावक घटना! भरधाव कारने दुचाकीला उडवले, पतीचा जागीच मृत्यू; पत्नी गंभीर जखमी

Maharashtra Rain Update: राज्यात कोसळधार! कोकणाला पावसाने झोडपलं, नदी-नाल्यांना पूर; शाळा-कॉलेजला सुट्टी जाहीर

Marathi Live News Updates : मोठी बातमी! अंधेरी सब-वे दुसऱ्यांदा वाहतुकीसाठी बंद

Akola News: मोठी बातमी! मुसळधार पावसामुळे पोलीस भरती प्रक्रिया स्थगित, मैदानी चाचणी पुढे ढकलली

Thane Viral Video: ठाणे शहराला पावसाने झोडपलं; दुकानात, घरात शिरलं पाणी; VIDEO VIRAL

SCROLL FOR NEXT