ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
सध्या प्रत्येक तरुणाई नवीन नोकरीच्या शोधात आहे.
मात्र अनेकदा नोकरी मिळवण्यासाठी काही महत्त्वपूर्ण कौशल्य तरुणांकडे नसल्याचे दिसून आले आहे.
नवीन नोकरीत स्वता:चा चांगला ठसा उमटवण्यासाठी प्रत्येकाकडे कौशल्य आवश्यक असतात.
सध्या प्रत्येक क्षेत्रातील नोकरीत अनेक आव्हाने निर्माण होत आहे त्यामुळे तरुणांनी नवीन आव्हानांना सामोरे जायला शिकावे.
सध्या प्रत्येक क्षेत्राची व्यापकता वाढत आहे. त्यात अनेक कामांमध्ये डेटा वापरण्यात येतो,त्यामुळे डेटा संबंधिक कौशल्य तुमच्याकडे असणे महत्त्वाचे आहे.
कोणत्याही क्षेत्रात आपले काम इतरांपेक्षा वेगळे दिसण्यासाठी कामात क्रिएटिव्हीटी दाखवणे महत्त्वाचे ठरते.
क्षेत्र कोणतेही असो मात्र तुम्ही त्यात निर्माण होणाऱ्या समस्या कशा पद्धतीने सोडवतात ते महत्त्वाचे असते.