JioPhone Prima 4G  Saam Tv
लाईफस्टाईल

JioPhone Prima 4G : jio चा नवीन फोन झाला लॉन्च, कमी किंमतीत दमदार फिचर्स

Shraddha Thik

JioPhone Prima 4G Launch In India :

Jio ने आपल्या भारतीय वापरकर्त्यांसाठी एक नवीन स्मार्ट फीचर फोन लाँच केला आहे. कंपनीने JioPhone Prima 4G फोन सादर केला आहे. वास्तविक, जिओने भारतीय मोबाइल काँग्रेस इव्हेंटमध्ये आपल्या वापरकर्त्यांसाठी नवीन फोन (Phone) लॉन्च केला.

वापरकर्त्यांसाठी आणलेले नवीन Jio डिव्हाइस एक फीचर (Feature) फोन आहे. या फोनमध्ये यूजर व्हॉट्सअ‍ॅप आणि यूट्यूबचा वापर करू शकणार आहेत. JioPhone Prima 4G फोन हा नवीन टेक्निकसह आणला आहे. या फोनमध्ये 23 भाषा सपोर्ट करतात. Jio चा नवीन फोन प्रीमियम डिझाइनसह येतो.('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

जिओच्या नवीन फोनचे फीचर्स आणि किंमत पाहूया -

  • प्रोसेसर - JioPhone Prima 4G फोन ARM Cortex A53 प्रोसेसरसह येतो.

  • डिस्प्ले - JioPhone Prima 4G फोन 2.4 इंच डिस्प्लेसह आणला आहे.

  • रॅम आणि स्टोरेज – Jio चे नवीन डिव्हाइस ( Device) 128GB स्टोरेजसह येते. फोन 512MB रॅम सह येतो.

  • कॅमेरा – Jio चे नवीन डिव्हाइस 0.3MP रियर कॅमेरासह येते.

  • बॅटरी - JioPhone Prima 4G फोन 1800mAh बॅटरीसह येतो.

  • ऑपरेटिंग सिस्टम - JioPhone Prima 4G फोन KaiOS वर चालतो.

  • रंग - ग्राहक JioPhone Prima 4G फोन पिवळा आणि निळा अशा दोन रंगांच्या पर्यायांमध्ये खरेदी करू शकतात.

फीचर्स -

JioPhone Prima 4G फोन 3.5mm ऑडिओ जॅक आणि FM रेडिओ सपोर्टसह आणला आहे. फोनमध्ये सिंगल सिम कार्ड स्लॉट आणि ब्लूटूथ आवृत्ती 5.0 आहे. हा फोन गुगल मॅप्स, फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप आणि यूट्यूब सारख्या 1200 अ‍ॅपला सपोर्ट करतो. JioTV, Jio Cinema, JioSaavn, JioNews सारखे इतर अनेक अ‍ॅप फोनमध्ये प्री-इंस्टॉल केलेले आहेत.

किंमत -

JioPhone Prima 4G फोन 2,599 रुपयांना सादर करण्यात आला आहे. Jio चा नवीन फोन Jio Mart वर लिस्ट झाला आहे. कंपनी लॉन्च ऑफरसह ग्राहकांना कॅशबॅक डील, बँक आणि कूपन सवलत देखील देत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT