Jio World Plaza Mall Saam Tv
लाईफस्टाईल

Jio World Plaza Mall : दिवाळी धमाका! बीकेसीत रिलायन्सच्या लॅव्हिश मॉलचे उद्घाटन, खरेदी करण्याची नवी संधी

Jio World Plaza Mall Opening : रिलायन्स जियो इंडस्ट्रीजने दूरसंचार क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

Shraddha Thik

Ambani's New Mall Opening :

रिलायन्स जियो इंडस्ट्रीजने दूरसंचार क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. कंपनीने अजून काही क्षेत्रात प्रवेश करण्याच्या तयारीत आहे, आणि कंपनीने आधीच काही क्षेत्रांमध्ये प्रवेश केलाही आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

कंपनी आता देशातील पहिला लक्झरी मॉल (Mall) सुरू करण्यासाठी सज्ज आहे. भारतातील पहिला मोठा लक्झरी मॉल रिलायन्स इंडस्ट्रीज आज 1 नोव्हेंबर 2023 रोजी लाँच (Launch) करणार आहे. या मॉलमध्ये तुम्हाला अनेक विविध ब्रँड्स पाहायला मिळतील, ज्यामध्ये आंतरराष्ट्रीय ब्रँडचाही समावेश असेल. त्याबद्दल सविस्तर माहिती पाहूयात.

भारतातील पहिला मोठा लक्झरी मॉल

रिलायन्स (Reliance) इंडस्ट्रीज भारतातील सर्वात मोठा लक्झरी मॉल सुरू करणार आहे. जिओ वर्ल्ड प्लाझा मॉल असे त्याचे नाव असेल. जिओ वर्ल्ड प्लाझा मॉल वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, मुंबईत आज 1 नोव्हेंबर रोजी उद्घाटन होणार आहे.

तुम्हाला लक्झरी खरेदीचा अनुभव मिळेल

हा मॉल दिसायला जेवढा आलिशान असेल, तेवढाच तो तुम्हाला खरेदीच्या बाबतीतही आलिशान अनुभव देईल. Jio World Plaza Mall मध्ये असे अनेक ब्रँड्स असतील ज्यांच्याबद्दल तुम्ही फक्त ऑनलाइन चर्चेत ऐकले असेल किंवा ज्यांची नावे भारताव्यतिरिक्त इतर देशांमध्ये लोकप्रिय झाली असतील त्यामुळे येथे तुम्हाला लक्झरी खरेदीचा अनुभव घेता येईल.

मॉलमध्ये अनेक ब्रँड्स उपलब्ध असतील

या मॉलमध्ये तुम्हाला अशा ब्रँड्सचे स्टोअर्स मिळतील, जे केवळ ऑनलाइन माध्यमातून किंवा देशाबाहेर उपलब्ध आहेत. फॅशन हाउस लुई व्हिटॉन, गुच्ची, डायर, मनीष मल्होत्रा, पॉटरी बार्न, जगप्रसिद्ध ज्वेलर्स कार्टियर आणि बल्गेरी (Bulgari) यांसारखे ब्रँड देखील असतील. बल्गेरी ब्रँड हा प्रथमच भारतीय बाजारपेठेत येत आहे. मॉलच्या इतर सेवांमध्ये वैयक्तिक दुकानदार, व्हीआयपी द्वारपाल आणि हमाल (कुली) देखील प्रदान केले जाते.

सध्या फक्त काही लक्झरी खरेदीची ठिकाणे आहेत

सध्या देशात केवळ काही लक्झरी शॉपिंग ठिकाणे आहेत. यामध्ये यूबी सिटी, डीएलएफ एम्पोरियो, फिनिक्स पॅलेडियम आणि द चाणक्य इत्यादींचा समावेश आहे. पूर्वी केवळ काही Five Star हॉटेल्समध्ये लक्झरी ब्रँडचे मर्यादित पर्याय होते. त्याच वेळी, आता रिलायन्स इंडस्ट्रीजच्या जिओ वर्ल्ड प्लाझा मॉलमधून भारतातील ब्रँडसह लक्झरी मॉल्समध्ये एक नवीन अनुभव पाहता येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shubman Gill : गिल दा मामला...! मँचेस्टर कसोटीत शुभमन गिलचे शतक, कॅप्टनने अनेक रेकॉर्ड मोडले

Gold Price: सोन्याची उसळी! सोन्याचा दर लवकरच 1 लाख 10 हजारांवर जाणार

Shivani Rangole: टिव्हीतल्या 'मास्तरीणबाई' चं सौंदर्य लाखात एक, फोटोंवर लाईक्स

Maharashtra Live News Update: खराडी पार्टीवर केलेली कारवाई राजकीय दृष्टिकोनातून करण्यात आली नाही ना? - रोहित पवार

Shocking: पोहण्यासाठी धरणात उडी मारली, परत बाहेर आलेच नाहीत; ४ जिवलग मित्रांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT