Reliance Jio New Recharge Plan: जिओचा 119 रुपयांचा सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन, अनलिमिटेड कॉलिंगसह मिळवा या सुविधा

Reliance Jio: नुकताच जिओ कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी अगदी स्वस्तात नवीन रिचार्ज प्लॅन आणला आहे.
Jio Recharge Plan
Jio Recharge PlanSaam Tv
Published On

Reliance Jio : देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओ (Reliance Jio) आपल्या ग्राहकांना नवनवीन रिचार्ज प्लॅन आणत असते. रिलायन्स कंपनी आपल्या ग्राहकांना अगदी स्वस्तात आणि परवडणारे रिचार्ज प्लॅन (Cheapest Recharge Plans) ऑफर करत असते. त्यामुळे जिओचे कार्ड खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल आहे.

जिओच्या या रिचार्ज प्लॅनमध्ये सर्व नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग आणि मोफत एसएमएससह डेटा यासारखे फायदे उपलब्ध असतात. नुकताच जिओ कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी अगदी स्वस्तात नवीन रिचार्ज प्लॅन आणला आहे. हा प्लॅन फक्त 119 रुपयांचा आहे. या रिचार्ज प्लॅनबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत...

Jio Recharge Plan
Amravati Crime News: ब्रेकअपनंतर शेवटच्या भेटीने केला घात; दोघेही सापडले रक्ताच्या थारोळ्यात

रिलायन्स जिओचा 119 रुपयांचा हा रिचार्ज प्लॅन ग्राहकांना खूपच परवडणारा आहे. या प्लॅनमध्ये (Reliance Jio RS 119 Plan) कंपनी ग्राहकांना अनेक सुविधा देत आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला अनलिमिटेड एसटीडी आणि फ्री लोकल कॉलिंग ही सुविधा मिळणार आहे. त्याचसोबत हाय स्पीड 1.5 जीबी डेटा दररोज मिळणार आहे. यासोबतच तुम्हाला 300 मोफत एसएमएसचाही लाभ मिळणार आहे.

एवढेच नाही तर या प्लॅनवर रिचार्ज केल्यावर तुम्हाला JioTV, JioCinema JioSecurity, JioCloud सारख्या अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन देखील मिळणार आहे. अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 1.5 GB डेटासह हा Jio चा सर्वात स्वस्तातला प्लॅन आहे. जिओच्या या प्लॅनची ​​वैधता फक्त 14 दिवसांसाठी आहे.

Jio Recharge Plan
Maharashtra Political Crisis : महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप?; शिंदे सरकारमधील मंत्री म्हणाले, मी अत्यंत जबाबदारीने...

दरम्यान, तुम्हाल जर जास्त दिवसांच्या वैधता आणि 1.5 जीबी डेटासह इतर सुविधा पाहिजे असतील तर जिओचे इतर प्लॅन्स देखील उपलब्ध आहेत. यामध्ये Jio च्या 199 रुपयांच्या, 239 रुपयांच्या, 259 रुपयांच्या, 479 रुपयांच्या, 666 रुपयांच्या आणि 2545 रुपयांच्या प्लॅनचा समावेश आहे.

जिओच्या 199 रुपयांच्या प्लॅनची ​​वैधता 23 दिवसांची आहे. 239 रुपयांच्या प्लॅनची वैधता 28 दिवसांची आहे. जिओच्या 259 रुपयांच्या प्लॅनची वैधता एक महिन्याची आहे. 479 रुपयांच्या प्लॅनची वैधता दोन महिने म्हणजेच 56 दिवसांची आहे. 666 रुपयांच्या प्लॅनची वैधता 84 दिवसांची आहे. तर 2545 रुपयांच्या प्लॅनची वैधता 336 दिवसांची आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com