रिलायन्स जिओने पुन्हा एकदा ग्राहकांसाठी नवीन रिचार्ज प्लान आणला आहे. रिलायन्स जिओ ही देशातील सगळ्यात मोठी कंपनी असून ती प्रत्येक महिन्यात ग्राहकांना नवीन रिचार्ज ऑफर करत असते.
जर तुम्हाला सगळ्यात जास्त इंटरनेट स्पीड लागत असेल तर तुम्ही जिओ किंवा जिओ एअर फायबरचा प्लान घेऊ शकतात. जिओ (Jio) आपल्या एअर फायबर सेवेमध्ये वापरकर्त्यांना केवळ हाय स्पीड डेटाच देत नाही तर अनेक ऑफर (Offer) देखील देते.
स्वस्त प्रीपेड प्लान देण्यासोबतच कंपनी स्वस्त पोस्ट पेड आणि ब्रॉडबँड योजना देखील ऑफर करते. युजर्सच्या सोयीसाठी कंपनीने मागच्या वर्षी जिओ फायबर लॉन्च केले. यामध्ये केबलशिवाय वापरकर्त्यांना १ जीबी पर्यंत हायस्पीड इंटरनेट सेवा मिळणार आहे. जिओ एअर फायबरमध्ये अनेक योजना मिळत आहे.
जिओ एअर फायबरच्या या जबरदस्त प्लानची किमत (Price) ५९९ रुपये इतकी आहे. यामध्ये हाय स्पीड डेटासह ओटीटीच्या अॅप्सचे फ्रीमध्ये सबस्क्रिप्शन मिळत आहे. जिओ एअर फायबरचा हा प्लान ५९९ रुपयांना असून ३० दिवसांसाठी वैध राहिल. यामध्ये कंपनी युजर्सला १००० जीबी डेटा देत आहे.
यामध्ये दिवसाला डेटा मर्यादा नाही. जिओ एअर फायबरचा हा प्लान 30mbps च्या स्पीडने युजर्सना मिळणार आहे. जर तुम्ही हा प्लान घेत असाल तर तुम्हाला जीएसटी देखील भरावे लागणार आहे. त्यामध्ये तुम्हाला अधिक शुल्क भरावे लागतील.
जिओ एअर फायबरमध्ये ग्राहकांना १३ ओटीटी अॅप्सचे फ्री सबस्क्रिप्शन मिळत आहे. जर तुम्हाला ओटीटी स्ट्रीमिंगची आवड असेल तर ओटीटीसाठी वेगळे पैसे खर्च करावे लागणार नाही. Jio Air Fiber च्या या 599 रुपयांच्या प्लॅनमध्ये Disney + Hotstar, Voot Select, SonyLIV, ZEE5, Voot Kids, Discovery +, Sun NXT, Hoichoi, Universal +, Lionsgate play, ALT Balaji, Eros Now, ShemarooMe, Jio Cinema चे सबस्क्रिप्शन आणि Jio Savan मिळणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.