Man Sleeps 30 Minutes Saam TV
लाईफस्टाईल

Man Sleeps 30 Minutes : जादूच झाली! १२ वर्षांपासून तरुण फक्त ३० मिनिटे झोपतोय; चेहऱ्यावरील तेज आणि फिटनेस पाहून तुम्हीही व्हाल चकीत

Japanese Man Sleeps Only 30 Minutes : झोप पूर्ण न झाल्यास आपल्या आरोग्यावर त्याचा परिणाम होतो. मात्र जपानमधील एक व्यक्ती फक्त ३० मिनिटांत आपली ८ तासांची झोप पूर्ण करत असल्याची माहिती समोर आली आहे.

Ruchika Jadhav

सुदृढ आणि निरोगी आयुष्य प्रत्येक व्यक्तीला हवंस वाटतं. त्यासाठी आपण अन्न आणि पाण्यासह पुरेशी झोप घेणे सुद्धा महत्वाचं आहे. डॉक्टर देखील निरोगी आयुष्य जगायचे असल्यास जास्तीत जास्त ८ आणि कमीत कमी ६ तास तरी झोपले पाहिजे असे सांगतात.

झोप पूर्ण झाली नसल्यास व्यक्तीला थकवा जाणवतो. डोकं दुखतं, स्वभाव चिडचिडा होतो, अनेक आजार लगेचच जडतात. झोप पूर्ण न झाल्याने अनेक व्यक्तींना पोट साफ न होण्याच्या समस्या सुद्धा जाणवतात. मात्र जपानमधील एक ४० वर्षीय व्यक्ती दिवसभरातून फक्त ३० मिनिटे म्हणजे आर्ध्याच तासाची झोप घेतो अशी माहिती समजली आहे. हा व्यक्ती फक्त आर्धा तासात झोप पूर्ण करतो आणि गेल्या १२ वर्षांपासून तो असे करत असून त्याला यात कोणताही त्रास जाणवत नाहीये.

साउथ चायना मॉर्निंग पोस्टच्या रिपोर्टनुसार, डायसुके होरी असं या जापानी व्यक्तीचं नाव आहे. त्याने स्वत: आपल्या झोपेबद्दल असा दावा केला आहे. पश्चिम जपानच्या ह्योदो प्रान्तांत राहणाऱ्या होरीने म्हटलं आहे की, फक्त ३० मिनिटांत झोप पूर्ण करण्यासाठी मी माझा मेंदू आणि शरीराला ट्रेन केलं आहे. या रुटीनमुळे माझ्या आरोग्यावर चांगला परिणाम झाला आहे. यासाठी मी जेवणाच्या एक तास आधी एक कप कॉफी पितो. त्यामुळे मला जास्त झोप लागत नाही, असंही होरीने सांगितलं आहे.

जास्त झोपेपेक्षा चांगली झोप उत्तम

आपण जास्त वेळ झोपण्यापेक्षा चांगली झोप घेण्याकडे लक्ष दिलं पाहिजे. कारण त्याने आपल्या शरीराला जास्त ऊर्जा मिळते. उगाच जास्त वेळ झोपल्याने आपली अनेक कामे मागे राहतात. डॉक्टर किंवा मग फायर ब्रिगेडच्या व्यक्ती जास्त काम करतात आणि कमी झोपतात. मात्र पुन्हा आपल्या कामावर परतताना त्यांना कोणताही त्रास होत नाही. सारख्याच उर्जेने ते काम करतात, असंही होरीने म्हटलं.

कमी वेळात जास्त झोप घेण्याचे क्लासेस

हेरी जो दावा करत आहे तो खरा आहे की खोटा हे तपालण्यासाठी योमीउरी टीव्हीने 'विल यू गो विथ मी' या रिअॅलीटी शोमध्ये त्याला आमंत्रित केलं होतं. येथे समजलं की हेरी दिवसभरातून फक्त २६ मिनिटे झोपला. कमी वेळ झोपून सु्द्धा त्याला कोणताही त्रास झाला नाही. शिवाय त्याने यासह वर्कआउट केलं, नाश्ता केला, बाहेर फिरला अशी सर्व सामान्य कामे त्याने केली. मी स्वत: चांगली झोप घेण्यासाठी शॉर्ट स्लीपर्स ट्रेनिंग असोसिएशनमध्ये क्लास घेत आहे.

या क्लासची सुरूवात २०१६ मध्ये झाली. तेव्हापासून अनेक व्यक्तींना हा क्लास पूर्ण केला आहे. जवळपास २१०० व्यक्ती या पद्धतीने आपल्या झोपेवर नियंत्रण ठेवतात. असे केल्याने व्यक्ती जास्त निरोगी राहतो. तसेच त्याला कोणताही थकवा जाणवत नाही. यासह त्याला दीर्घ आयुष्य मिळते असा दावा देखील यात करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Congress Leader Death : काँग्रेसच्या नेत्याची दिवसाढवळ्या हत्या, दुचाकीवरुन आलेल्या हल्लेखोरांनी झाडल्या गोळ्या

Maharashtra Live News Update: - तुळजापूर डान्स प्रकरण : जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्याकडून दिलगिरी व्यक्त

धाराशिव दौऱ्यात संजय राऊतांनी खाल्ले काजू, बदाम; कुणी केला दावा? | VIDEO

Shocking News : तरूणीसोबत घडली विचित्र घटना, बाथरूममध्ये आंघोळीला गेली अन् कोपऱ्यातलं दृश्य बघून हादरलीच!

निवडणुकीचं बिगुल वाजलं! माजी मुख्यमंत्र्यांच्या पक्षाची पहिली यादी जाहीर, प्रसिद्ध गायकाला मिळाली उमेदवारी

SCROLL FOR NEXT