Japanese doctors artificial blood saam tv
लाईफस्टाईल

Artificial Blood: चक्क जांभळ्या रंगाचे रक्त तयार, डॉक्टर याचा वापर कसा करणार?

Japanese doctors artificial blood: जपानमधील वैज्ञानिक आणि डॉक्टर्स कृत्रिम रक्ताच्या संशोधनात आघाडीवर आहेत. या कृत्रिम रक्ताला 'रक्तपेशींच्या जागी ऑक्सिजन वाहून नेणारे पदार्थ' असेही म्हटले जाते.

Surabhi Jayashree Jagdish

  • जपानने कृत्रिम रक्त तयार केलं असून ते कोणत्याही रक्तगटात वापरता येईल.

  • हे रक्त ऑक्सिजन वाहून नेण्याचे काम नैसर्गिक रक्तासारखं करतं.

  • हे जांभळ्या रंगाचं रक्त लिपिड मेम्ब्रेनमध्ये गुंडाळलेल्या हिमोग्लोबिनपासून तयार केलं जातं.

अपघातांनंतर होणारे उपचार, हृदय शस्त्रक्रिया किंवा अवयव प्रत्यारोपणासारख्या मोठ्या उपचारांमध्ये रुग्णाला तातडीने रक्ताची आवश्यकता भासते. मात्र भारतासह अनेक देशांमध्ये रक्तदानाची कमतरता ही एक मोठी समस्या बनलीये. याच पार्श्वभूमीवर वैद्यकीय विज्ञान जगतातून एक दिलासादायक बातमी आलीये.यामध्ये संशोधकांनी कृत्रिम रक्त तयार केलं आहे. जे तातडीच्या वैद्यकीय गरजांमध्ये जीव वाचवण्याचं मोठं साधन ठरू शकतं.

कृत्रिम रक्ताची गरज का होती?

जगात रक्ताची कमतरता ही एक मोठी समस्या आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने लोक मृत्युमुखी पडतात. पण आता असं होणार नाही, कारण जपानने असे कृत्रिम रक्त तयार केलंय जे गेम चेंजर ठरणार आहे. आपण असं म्हणू शकतो की, जपानने वैद्यकीय क्षेत्रात एक नवीन युग सुरू केलंय. यावेळी त्यांनी जांभळ्या रंगाचं रक्त तयार केलं आहे.

कसं काम करतं कृत्रिम रक्त?

या कृत्रिम रक्ताला हिमोग्लोबिन वेसिकल्स (HbVs) म्हणून ओळखलं जातं. हे कृत्रिम रक्त अत्याधुनिक जैवतंत्रज्ञानाच्या साहाय्याने तयार करण्यात आलं असून माणसाच्या नैसर्गिक रक्तासारखेच कार्य करतं. यामध्ये ऑक्सिजन वाहून नेण्याची क्षमता आहे आणि हे वापरणं पूर्णतः सुरक्षित आहे.

या रक्तात अनेक खास वैशिष्ट्ये आहेत. हे असे कृत्रिम रक्त आहे जे खऱ्या रक्ताप्रमाणेच शरीराच्या प्रत्येक भागात ऑक्सिजन वाहून नेण्यास सक्षम आहे. हे हिमोग्लोबिनवर आधारित आहे, जो लाल रक्तपेशींचा भाग आहे जो वाहून नेतो. या जपानी तंत्रज्ञानामध्ये लिपिड मेम्ब्रेनमध्ये गुंडाळलेल्या नॅनो-आकाराच्या हिमोग्लोबिन कणांचा वापर केला जातो. ज्यामुळे ते २५० नॅनोमीटरच्या लहान कृत्रिम लाल रक्तपेशींसारखे काम करतात. त्याचा जांभळा रंग त्याला सामान्य रक्तापेक्षा वेगळे करतो, जो लाल रंगाचा असतो.

कोणाला दिलं जाऊ शकतं हे रक्त?

हे रक्त यूनिवर्सल ब्लड असेल. ते कोणत्याही रक्तगटाच्या (A, B, AB, O) व्यक्तीला दिलं जाऊ शकतं. कारण त्यात रक्तगटाचे मार्कर नसतात. यामुळे रक्तगट मिसळण्याची गरज दूर होण्यास मदत होणार आहे. मुख्य म्हणजे हे विषाणूमुक्त असून त्यामुळे HIV, हिपॅटायटीस सारख्या विषाणूंचा धोका राहणार नाही.

हे रक्त किती काळ साठवता येईल?

या रक्ताचं आयुष्य जास्त आहे. ते खोलीच्या तापमानावर २ वर्षांपर्यंत साठवता येऊ शकतं. तर सामान्य रक्त फक्त ४२ दिवस टिकतं. ते जुन्या किंवा कालबाह्य झालेल्या दान केलेल्या रक्तापासून बनवता येतं, ज्यामुळे रक्ताचा अपव्यय कमी होण्यासही मदत होणार आहे. ते नैसर्गिक रक्ताइतकेच प्रभावीपणे शरीरात ऑक्सिजन पोहोचवते.

कसं तयार केलं हे रक्त?

जपानमधील नारा मेडिकल युनिव्हर्सिटीमधील प्रोफेसर हिरोमी सकाई आणि त्यांच्या टीमने हे तयार केलं आहे. ते बनवण्यासाठी एक अनोखी प्रक्रिया अवलंबण्यात आली. जुन्या किंवा कालबाह्य झालेल्या दान केलेल्या रक्तातून हिमोग्लोबिन काढलं जातं. नंतर हिमोग्लोबिन एका नॅनो-आकाराच्या लिपिड मेम्ब्रेनमध्ये गुंडाळले जातं, जे त्याला स्थिरता देण्यात मदत करतं.

रुग्णांना कसा फायदा होईल?

रक्तटंचाईवर नियंत्रण

भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात रक्ताची कमतरता ही एक मोठी समस्या आहे. हे कृत्रिम रक्त आल्याने ही टंचाई दूर होईल आणि गरजू रुग्णांना तातडीने मदत मिळेल.

आपात्कालीन परिस्थितीत उपयोगी

रस्ते अपघात, युद्धजन्य परिस्थिती किंवा नैसर्गिक आपत्ती अशा घटनांमध्ये रक्तगट मिळेपर्यंत वेळ जातो. पण हे कृत्रिम रक्त कोणत्याही गटात वापरता येतं, त्यामुळे लगेच देणं शक्य होतं.

साठवणूक व वाहतूक सोपी

जिथे रक्त साठवण्यासाठी योग्य सुविधा नसतात, अशा ठिकाणी हे कृत्रिम रक्त अधिक फायदेशीर ठरेल. कारण याला स्टोअर करणं आणि वाहतूक करणं सोपं आहे.

कमी खर्चात सुरक्षित उपचार

या रक्तात संसर्ग होण्याचा किंवा व्हायरस पसरण्याचा धोका नाही. त्यामुळे याचा वापर मोठ्या प्रमाणावर करणे शक्य होईल आणि खर्चही कमी येईल.

कृत्रिम रक्त का तयार करण्यात आलं?

रक्ताची टंचाई दूर करण्यासाठी आणि आपत्कालीन गरजा भागवण्यासाठी.

हे रक्त कोणत्याही व्यक्तीला देता येतं का?

होय, हे यूनिवर्सल ब्लड आहे; कोणत्याही रक्तगटाला देता येतं.

कृत्रिम रक्ताची कार्यपद्धती कशी असते?

हे रक्त हिमोग्लोबिनच्या सहाय्याने शरीरात ऑक्सिजन पोहोचवतं.

हे रक्त किती काळ साठवता येतं?

खोलीच्या तापमानावर २ वर्षांपर्यंत साठवता येतं.

कृत्रिम रक्ताचा वापर रुग्णांना कसा मदत करतो?

तातडीच्या उपचारांत, दुर्गम भागात आणि संसर्गविरहित सुरक्षित पर्याय म्हणून उपयोग होतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saturday Horoscope : दवाखान्यावर खर्च होणार, मित्रांच्या चुका माफ करणार; ५ राशींच्या लोकांना राहावे लागेल सावध, जाणून घ्या

Morning Health Tips: रोज सकाळी पोट साफ होत नाही? आहारात करा 'हे' 5 बदल

Yogesh Kadam : आधी पुण्यातील गुन्हेगारीचा आलेख वाचला; नंतर गृहराज्यमंत्र्यांनी गुन्हे रोखण्याचा सरकारचा 'राणबाण उपाय'च सांगितला

Akola Shocking : दिवसभर ५ वर्षांचा चिमुकला बेपत्ता, नंतर सांडपाण्याकडे लक्ष गेलं; दृश्य पाहून कुटुंब हादरलं

Raj Thackeray : महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री हिंदीसाठी का भांडतोय? राज ठाकरेंचा थेट सवाल

SCROLL FOR NEXT