Foot care in monsoon: पावसाळी चपलांमुळे तुम्हालाही सतावतेय गुडघेदुखीची समस्या? तज्ज्ञांनी दिल्यात खास टीप्स

Rainy season shoes knee pain: गुडघेदुखी ही केवळ वातावरणातील बदलांमुळे होते, पण खरं कारण आपले पावसाळ्यातील पादत्राणे देखील असू शकतात. तज्ज्ञांच्या मते, पावसाळ्यात चुकीच्या चप्पल किंवा शूजमुळे गुडघ्यांवर अतिरिक्त ताण येऊ शकतो, ज्यामुळे वेदना वाढतात.
Rainy season shoes knee pain
Rainy season shoes knee painsaam tv
Published On

पावसाळ्यात आपल्या शूज किंवा लक्ष देणं आणि योग्य निवड करणं आवश्यक आहे. पावसाळ्यात चुकीच्या चपलांचा वापर केल्यास गुडघे, पाठदुखी आणि घोट्याच्या दुखापतींचा धोका वाढू शकतो. या दिवसात उंच टाच आणि गुळगुळीत पृष्ठभाग असलेली चप्पल वापरणे टाळा.

नवी मुंबईतील ऑर्थोपेडिक सर्जन डॉ अभय छल्लानी यांनी सांगितलं की, पावसाळ्याच्या दिवसात रस्त्यावर पाणी तुंबते, त्यामुळे अनेकवेळा रस्त्यावर मोठे खड्डे पडलेले दिसत नाहीत आणि अशा परिस्थितीत अपघाताची शक्यता वाढते. बहुतेकदा लोकं या दिवसात कोरडे राहणे आणि संसर्ग टाळण्यासंबंधी विविध उपाययोजना राबवतात मात्र चपलांशी संबंधित होणाऱ्या सांधेदुखीकडे मात्र दुर्लक्ष करतात.

पावसाळ्यात चुकीच्या पादत्राणांचा वापर केल्याने गुडघे, घोटे आणि अगदी तुमच्या कंबरेजवळील स्नायुंवरही ताण येऊ शकतो. या दिवसात बरेच जण फ्लिप-फ्लॉप, सँडल्स किंवा गुळगुळीत पृष्ठभाग असलेल्या स्लीपर्सची निवड करतात, परंतु ते पुरेसा आधार देऊ शकत नाहीत. कालांतराने, असमान किंवा ओल्या पृष्ठभागावर चालल्याने सांधे कडक होणे, पडणे किंवा सांध्यांचे दीर्घकालीन नुकसान होऊ शकते, विशेषतः ज्यांना आधीच गुडघे किंवा पायाचे आजार आहेत त्यांना यामुळे अधिक त्रास होण्याची शक्यता असते. गुडघ्यांच्या बाबतीत अत्यंत सावधगिरी बाळगा, असंही डॉ. छल्लानी यांनी सांगितलंय.

पावसाळ्यात तुमचे गुडघे आणि घोटे सुरक्षित ठेवण्यासाठी खास टिप्स

योग्य चपलांची निवड करा

रबर-सोल असलेले शूज किंवा अँटी-स्लिप तंत्रज्ञान वापरण्यात आलेली पादत्राणे निवडण्याचा प्रयत्न करा. यामुळे पडणे आणि घोटे दुखापतींचा धोका कमी होतो आणि तुम्हाला कोणत्याही आव्हानाशिवाय पावसाळ्याचा आनंद घेता येतो. या दिवसात उंच टाचांची पादत्राणे वापरणे टाळा.

योग्य आधार देणारी चपला निवडा

आर्च सपोर्ट आणि कुशनिंग असलेले शूज तुमच्या गुडघ्यांवरील दबाव कमी करण्यास मदत करतात आणि चालताना तुमच्या सांधांवर ताण येत नाही.

Rainy season shoes knee pain
Liver cirrhosis symptoms at night : रात्री झोपताना शरीरात 5 लक्षणं दिसली तर सावध व्हा; लिव्हर सिरोसिस असण्याचा धोका

चप्पल वापरणे टाळा

फ्लॅट सँडल्स आणि फ्लिप-फ्लॉप कोणतेही संरक्षण देत नाहीत. जास्त वेळासाठी यांचा वापर केल्याने गुडघे आणि टाचांना वेदना होऊ शकतात.

एक अतिरिक्त जोड सोबत ठेवा

जर तुमचे शूज ओले झाले तर ते दिवसभर घालू नका. ते बदलण्यासाठी एक अतिरिक्त कोरड्या पादत्रांणांचा जोड सोबत ठेवा आणि ओली पादत्राणे योग्यरित्या सुकवा आणि मगच त्यांचा वापर करा.

तुमचे तळवे नियमितपणे स्वच्छ करा

तळवे कोरडे आणि स्वच्छ ठेवल्यास अपघातांची शक्यता कमी होते. पावसाळ्यात तुमच्या पायांना योग्य आधार देणाऱ्या पादत्राणांचा वापर करा

Rainy season shoes knee pain
Fatty liver: रात्रीच्या वेळेस दिसतात फॅटी लिव्हरची लक्षणं; शरीरात 'हे' बदल होत असतील तर सावध व्हा

गरज भासल्यास ऑर्थोटिक इनसोल्स वापरा

जर तुम्हाला गुडघ्यांचा त्रास असेल किंवा फ्लॅट फुटची समस्या असेल तर पायांना योग्य आराम आणि आधाराकरिता ऑर्थोटिक इनसोल्स वापरा.

Rainy season shoes knee pain
Blood cancer symptoms: ब्लड कॅन्सर झाल्यावर शरीर तुम्हाला देतं 'हे' संकेत; हा कॅन्सर होण्यामागे काय कारणं असू शकतात?

पावसाळ्यात तुमची निवडलेली पादत्राणे केवळ खड्ड्यांपासून तुमचं संरक्षण करत नाहीत तर ती सांध्यांना देखील पुरेसा आधार देते. पाय घसरणार नाही, पायांच्या वेदना दूर राहतील अशा पादत्राणांची निवड करुन तुम्ही या पावसाळ्याचा मनमुराद आनंद घेऊ शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com