IVF Pregnancy  Saam Digital
लाईफस्टाईल

IVF Pregnancy : गर्भधारणेचं प्रमाण घटलं? इतक्या कोटी महिलांना लागते IVF ची गरज, रिपोर्टमधून धक्कादायक माहिती समोर

IVF Pregnancy Report देशात गर्भधारणेसाठी दर पाचपैकी तीन महिलांना IVF उपचारांची गरज पडत असल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. गेल्या दशकात देशातला सामान्य प्रजनन दर 20 टक्क्यांनी कमी झालं आहे.

Girish Nikam

बातमी आहे देशात वाढत्या IVF प्रेगनन्सीसंदर्भातली... देशात गर्भधारणेसाठी दर पाचपैकी तीन महिलांना IVF उपचारांची गरज पडत असल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. गेल्या दशकात देशातला सामान्य प्रजनन दर 20 टक्क्यांनी कमी झालाय. पाहूया एक रिपोर्ट....

लग्नानंतर अनेक जोडप्यांची पालक बनण्याची इच्छा असते. प्रत्येक महिलेला कधी ना कधी तरी आई बनायचं असतं.. मात्र अनेकाचं हे स्वप्न पूर्ण होत नाही. अशा परिस्थितीत इन विट्रो फर्टिलायझेशन म्हणजेच आयव्हीएफ उपचारांचा आधार असतो. आकडेवारीच पाहिली तर एका दशकापूर्वी पाचपैकी फक्त एका महिलेला आयव्हीएफची गरज होती. पण आता पाचपैकी तीन महिलांना आयव्हीएफची गरज आहे. एका आरोग्य सेवा संस्थेने केलेल्या अभ्यासानुसार गेल्या दशकात भारतातील सामान्य प्रजनन दर 20 टक्क्यांनी घसरला आहे. सध्या तीन कोटी लोक वंध्यत्वाने त्रस्त आहेत.

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार प्रजनन दर घसरण्यामागे ताणतणाव कारणीभूत आहे.करिअरच्या शर्यतीत अनेक महिला आई होण्याचे वय चुकवतात. याशिवाय बदललेल्या जीवनशैलीमुळे तणाव, नैराश्य, लठ्ठपणा, मधुमेह, दूषित वातावरण यामुळे महिलांच्या वाढत्या वयाबरोबर अंड्यांमध्ये दोष आढळून आले आहेत. पुरुषांच्या शुक्राणूंच्या संख्येवरही परीणाम होत आहे. अनेक महिलांमध्ये अनुवांशिक आणि चयापचय विकारांमुळे, स्त्रीबीजाचं प्रमाण कमी होतय आणि लहान वयातच त्यांची गुणवत्ता खराब होते.त्यामुळे गर्भधारणेची समस्या वाढत आहे. अशा महिला आयव्हीएफचा पर्याय अधिक प्रमाणात स्वीकारत आहेत.

पूर्वी ३५ ते ४० वयोगटातील महिला मातृत्वासाठी आयव्हीएफचा पर्याय निवडत असत. मात्र आता वयाच्या २५ व्या वर्षी महिला हा पर्याय निवडत आहेत. इंडियन मेडिकल अँड रिसर्च कौन्सिलच्या अहवालानुसार, 35 च्या खाली हा दर 47.6 टक्के आहे. त्याचवेळी 35 ते 37 वर्षे वयाच्या केवळ 38.9 टक्के महिला, 38 ते 40 वर्षे वयाच्या 30.1 टक्के आणि 41 ते 42 वर्षे वयाच्या 20.5 टक्के महिला गर्भवती होऊ शकतात. त्यामुळे आई होण्याचं तुमचं गोड स्वप्न पूर्ण करण्यासाठी योग्य जीवनशैली अंगिकारणं गरजेची आहे. आरोग्य विभागाकडूनही विविध पातळींवर जनजागृतीची गरज आहे. नाहीत भारतासारख्या देशात मातृत्वाची समस्या गंभीर रूप धारण करेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kharadi Rave Party: पार्टीत ड्रग्ज सापडलं..;पुण्यातील रेव्ह पार्टीवर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया

गाणं लावण्यावरून वाद; शिंदेंच्या नेत्याकडून तरूणावर प्राणघातक हल्ला, काळंनिळं होईपर्यंत मारलं

Maharashtra Live News Update: पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरण; सर्व आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी

5G Phones India : कोणत्या स्वस्तात कमी बजेट मध्ये 5G फोन कॅमेरा आणि बॅटरी लाईफ चांगली आहे?

Ambarnath Crime : अंबरनाथमधील हल्ला प्रकरणात धक्कादायक खुलासा; सहा तरुणांविरोधात गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT