Healthy fat, Health tips, Food ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

निरोगी राहण्यासाठी योग्य प्रमाणात फॅट्सचे सेवन करणे आवश्यक

निरोगी राहण्यासाठी फॅट्सचे सेवन कसे करावे ?

कोमल दामुद्रे

मुंबई : फिट राहायचे असेल तर फॅटपासून दूर रहा असे आपल्या सांगितले जाते. परंतु, जितके आपल्याला फिट राहायचे असते तितक्याच प्रमाणात आपल्या शरीराला फॅटची आवश्यकता असते.

हे देखील पहा -

आपल्याला वजन कमी (Weight loss) करण्यासाठी फॅट असणारे पदार्थ न खाण्याचा सल्ला दिला जातो परंतु, आहारातून फॅट अगदीच काढून टाकले तर त्याचा आपल्या आरोग्यावर परिणाम होऊ लागतो. शरीराला निरोगी ठेवण्यासाठी आपल्याला काही फॅट्स असणारे पदार्थ खाणे आवश्यक आहे. यासाठी आपण आहारात समावेश करणाऱ्या पदार्थांमध्ये २० ते ३५ टक्के फॅट असायला हवे. त्यामुळे आपल्याला कामे अधिक जलद गतीने करण्यास ऊर्जा मिळते. अनेकांना असे वाटते शरीरात साठलेली चरबी ही अतिशय वाईट आहे परंतु, गुड फॅट व बॅड फॅटमधील फरक आपल्याला कळायला हवा. तसेच ते आपल्या शरीरासाठी का आवश्यक आहे हे देखील समजायला हवे. ते कसे हे जाणून घेऊया.

१. मेंदू आणि डोळ्यांच्या (Eye) आरोग्यासाठी फॅट असणे आवश्यक आहे. ओमेगा-३ फॅटी अॅसिड, ईपीए व डीएचए मेंदूचे आरोग्य उत्तम ठेवण्यास मदत करते. त्यासाठी आपल्याला आहारात फॅट सामील करायला हवे.

२. हार्मोन्ससारखे टेस्टोस्टेरॉन व एस्ट्रोजन हे आहारात फॅटचा समावेश केल्यामुळेच बनतात. याशिवाय ए, डी, ई आणि के ही जीवनसत्त्व फॅट सोल्यूबल असतात. अर्थातच ही जीवनसत्त्वे फॅटसोबत घेतल्याने शरीराला त्याचा फायदा होईल.

३. फॅटचा प्रत्येक ग्रॅम हा आपल्या शरीराला ९ कॅलरी ऊर्जा देतो, तर कार्बोहायड्रेट व प्रथिनेचा प्रत्येक ग्रॅम हा फक्त ४ कॅलरीची ऊर्जा देतो.

शरीराला योग्यप्रकारे काम करण्यासाठी पॉलीज अनसॅच्युरेटेड फॅटची आवश्यकता अधिक आहे. यामुळे शरीरात चरबी बनत नाही परंतु, तरी याचे सेवन गरजेचे आहे.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Edited By - Komal Damudre

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Adinath Kothare New Project: शिरगावच्या खुनाचं गुंतागुंतीचं कोडं सुटणार का? 1 मे पासून आदिनाथ कोठारे आणि पुष्कराज चिरपुटकर उलगडणार शिरगावचं रहस्य

४ टर्म आमदार राहिलेला भाजपच्या दिग्गज नेत्याचं निधन, राजकीय वर्तुळात शोककळा

Maharashtra News Live Update: आमदार दिपक केसरकर यांची घटनास्थळी भेट देत नुकसानीची पाहणी

Pankaja Munde: पंकजा मुंडेंना मुख्यमंत्री करा, बड्या नेत्याच्या विधानाने राजकारणात खळबळ

Mumbai : 'मला हिंदू मुली आवडतात...' अश्लील व्हिडिओ पाठवले, शारीरिक संबंधांची मागणी; नाशिकनंतर मुंबईत कॉर्पोरेट जिहाद

SCROLL FOR NEXT