Shreya Maskar
हेदवी हे रत्नागिरी जिल्ह्यातील एक महत्त्वाचे पर्यटन स्थळ आहे. हेदवीचा समुद्रकिनारा कोकणाची शान आहे.
श्री दशभुजा गणेश मंदिर हे हेदवीमधील एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे, जे कोकणातील एकमेव दशभुजा लक्ष्मी-गणेश मंदिर म्हणून ओळखले जाते.
दशभुजा गणेश मंदिर गुहागर डोंगराच्या कड्यावर वसलेले आहे. हे ठिकाण निसर्गरम्यता आणि धार्मिक स्थळांसाठी ओळखले जाते. येथील दहा हातांच्या गणेशाच्या मूर्तीसाठी प्रसिद्ध आहे.
बामणघळ हे हेदवीचे एक प्रमुख आकर्षण आहे, जिथे समुद्राच्या लाटा एका अरुंद घळीत शिरून प्रचंड वेगाने खडकांवर आदळतात आणि उंचावर उडतात.
स्वच्छ पाणी, काळी वाळू , थंड वातावरण यांसाठी हेदवी बीच ओळखला जातो. हेदवी बीचवर सूर्यास्त आणि सूर्योदयाचा सुंदर नजारा पाहायला मिळतो.
हेदवीजवळ वेळणेश्वर हा एक प्रसिद्ध आणि सुंदर समुद्रकिनारा आहे. वेळणेश्वर बीच जवळ एक प्राचीन शिवमंदिर देखील आहे.
हेदवीत बाणकोट किल्ला हे ऐतिहासिक ठिकाण आहे. बाणकोट किल्ला सावित्री नदीच्या काठी वसलेला आहे. हिवाळ्यात या ठिकाणाला नक्की भेट द्या.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.