Akola News: अकोल्यात विद्यार्थ्यांकडून पाकिस्तान जिंदाबाद'चे नारे? व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Pakistan Zindabad Students Slogan: अकोला जिल्ह्यातील अडगाव बुद्रूक गावातील एका वायरल व्हिडीओ'ने खळबळ उडालीय. येथील विद्यार्थ्यांकडून 'पाकिस्तान जिंदाबाद'चे नारे? देण्यात आले असा दावा करणारा व्हिडिओ व्हायरल झालाय.
Pakistan Zindabad Students Slogan:
Police presence in Adgaon Budruk, Akola, after a viral video claimed students chanted ‘Pakistan Zindabad’ slogans.saam tv
Published On
Summary
  • अडगाव बुद्रुक गावातील व्हिडिओ समाजमाध्यमांवर जोरदार व्हायरल होतोय.

  • विद्यार्थ्यांनी पाकिस्तान जिंदाबादचे नारे दिले?

  • गावात काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती

अक्षय गवळी, साम प्रतिनिधी

अकोला जिल्ह्यातील अडगाव बुद्रुक गावातला एक व्हिडिओ समाज माध्यमांवर 'व्हायरल' होतोये. यात अडगावातील काही विद्यार्थ्यांनी 'पाकिस्तान जिंदाबाद'चे नारे लावल्याचा दावा काही गावकऱ्यांनी केलाय. त्यानंतर अकोला पोलिसांनी गावात मोठा पोलीस बंदोबस्त वाढवत शांतता समितीची बैठक घेतलीय. दरम्यान, 'साम'Tv अडगाव बुद्रुक गावांत पोहचलीए, अन वायरल VIDEO मागील 'खरं सत्य' शोधलंय, तर पाहूया हा स्पेशल रिपोर्ट.

हे आहे, राष्ट्रीय तपास संस्थाच्या (NIA) रडारवर असलेलं अडगावं बुज्रूक गावं. याच गावातील शाळकरी विद्यार्थ्यांकडून पाकिस्तान जिंदाबाद, पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा? देण्यात आल्याचा दावा करणारा VIDEO राज्यभरात व्हायरल होतोय. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अकोला पोलीसांसह राष्ट्रीय तपास संस्थेसह ATS पथकाची मोठी धावपळ उडाली. काल रात्रीपासून अडगावात पोलिसांचा मोठा बंदोबस्त लागलाय. पोलीस सर्वांना शांततेचं आवाहन करू लागलेत.

Pakistan Zindabad Students Slogan:
Akola Crime: भररस्त्यात रक्तरंजित थरार! प्रेमप्रकरणातून चाकूने वार करत तरुणाची हत्या; अकोला हादरले

मात्र, याच 'व्हायरल' व्हिडीओवरून समाज माध्यमांत उलट-सूलट चर्चा सुरू झालीय. काही प्रत्यक्षदर्शी आणि गावकऱ्यांनी दिल्या गेलेल्या घोषणा 'पाकिस्तान जिंदाबाद'च्याच असल्याचं ठामपणे वाटतं. संपूर्ण चौकशीची मागणी होऊ घातली आहे.

व्हिडीओ व्हायरलनंतर गावात मोठा पोलीस बंदोबस्त लागला. IPS अधिकारी निखिल पाटील यांनी गावात ठाण मांडत शांतता समितीची सभा बोलवली. पोलिसांनी VIDEO मध्ये दिसणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शाळेत गेली, अन विद्यार्थ्यांशी संवाद साधत परिस्थिती जाणून घेतलीय. पुढं समोर आलेलं तथ्य माध्यमांसमोर मांडलंय.

दरम्यान व्हिडीओतील दिसणारे हे विद्यार्थी आहे हे मोहम्मदीया उर्दू वरिष्ठ प्राथमिक शाळेतील दुसऱ्या-तिसऱ्या वर्गातील आहेत. मात्र गावकऱ्यांनी केलेला आरोप फेटाळत विद्यार्थ्यांनी बहाद्दूर खान जिंदाबादचे नारे लावल्याचं म्हटलंय.

तर काय सत्य समोर आलंय पाहूया

पोलिसांच्या तपासात शाळकरी विद्यार्थ्यांकडून 'पाकिस्तान जिंदाबाद'च्या घोषणेचा दावा खोटा ठरला.

पाकिस्तान जिंदाबाद'च्या घोषणा नसून 'बहादुर खानच्या जिंदाबाद'च्या विद्यार्थ्यांकडून घोषणा दिल्याचा तपासात उघड.

व्हिडिओमधील एका मित्राच्या आजोबाचं नाव बहाद्दूर खान, आजोबाच्या नावावरून चिडवण्यासाठी विद्यार्थ्यांनी दिल्या बहाद्दूर खान जिंदाबादचे नारे,असं अकोला पोलिसांकडून स्पष्टीकरण देण्यात

Pakistan Zindabad Students Slogan:
Delhi Red Fort Blast Case: एनआयएची काश्मीरमध्ये 8 ठिकाणी छापे, तीन जणांना अटक

अकोल्याच्या अडगावमधील या प्रकाराने मोठी संदिग्धता निर्माण झालीये. पोलिसांच्या स्पष्टीकरणानंतरही यावरची चर्चा थांबता थांबत नाहीये. मात्र, गावकरी करीत असलेला दावा आणि पोलिसांचं यावर पडदा टाकणारं उत्तर यापलीकडे जात याची केंद्रीय तपास यंत्रणांकडून चौकशी होणे, गरजेचं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com