मायग्रेनमुळे वाढू शकतो तरुणांमध्ये इतर आजारांचा धोका

दीर्घकाळपर्यंत चालणारी डोकेदुखी ही पुढे मायग्रेनचे रुप धारण करते.
Health issue, Migraine problem
Health issue, Migraine problemब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
Published On

मुंबई : दीर्घकाळपर्यंत चालणारी डोकेदुखी ही पुढे मायग्रेनचे रुप धारण करते. मायग्रेनच्या वेदना काहीतासांपासून अनेक दिवसापर्यंत राहू शकतात.

हे देखील पहा -

असे समजले जात होते की, मायग्रेनचा त्रास हा डोक्याच्या रक्तवाहिन्यांच्या आकुंचन-प्रसारणामुळे होत असते. ज्यामुळे न्यूरोट्रान्समीटर्सचा संचार प्रभावित होऊन विशेष रुपाने सेरोटोनिनचे असंतुलन होत असते. मायग्रेनची समस्या ही युवा पिढीमध्ये अधिक प्रमाणात वाढताना दिसून येत आहे. १८ ते ३० वयांचा तरुणांनी यासाठी विशेष काळजी घ्यावी. यांचे प्रमुख कारण आपली बदलेली जीवनशैली, अपुरी झोप, काम करण्याच्या वेळा व खाण्यापिण्याच्या सवयी यामुळे मायग्रेनचा त्रास जाणवू लागतो.

सामान्य लोकांच्या तुलनेत मायग्रेन असणारे लोक डिप्रेशन व एंग्झायटीच्या तावडीत सापडण्याची शक्यता अधिक असते. तसेच स्ट्रोक, हृदयविकार, बेल्स पाल्सी, मिरगी यांसारख्या गंभीर समस्यांचा (Problems) धोकाही वाढतोय. यासाठी या आजारांकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

Health issue, Migraine problem
मधुमेह असणाऱ्यांसाठी फायदेशीर ठरेल कलोंजी जाणून घ्या, त्याचा उपयोग

१. मायग्रेन असणाऱ्या एक तृतीयांश लोकांमध्ये डोकेदुखी (Headache), प्रकाश सहन न होणे, हात व चेहऱ्यावर बधिरता वा मुंग्या जाणवता ही लक्षणे आढळून येतात. त्यामुळे त्यांना स्ट्रोक देखील येऊ शकतो. मायग्रेन असणाऱ्या लोकांच्या ब्लडप्लेटलेट्स सक्रिय होतात. ज्यामुळे गुठळ्या होण्याची शक्यता जास्त असते.

२. मायग्रेन असणाऱ्या लोकांना हृदयाशी संबंधित धोका होऊ शकतो असे युरोपियन जर्नल ऑफ न्यूरोलॉजीच्या संशोधनात सांगितले गेले आहे. मायग्रेनच्या काही औषधांमुळे हृदयाचा आजार उद्भवू शकतो. ही औषधे रक्तवाहिन्या संकुचित करतात व ज्यामुळे हृदयावर त्याचा ताण पडतो.

३. डिप्रेशन व बायपोलर डिसऑर्डर हा मायग्रेनमध्ये दुहेरी संबंध आहेत. ज्या व्यक्तींना मायग्रेन असतो त्यांना डिप्रेशन व बायपोलर डिसऑर्डरसारखे मानसिक विकार होण्याची शक्यता अधिक असते. तसेच डिप्रेशन व बायपोलर डिसऑर्डरने ग्रस्त असणारे लोक मायग्रेनचे सहज शिकार बनतात.

४. मायग्रेन असणाऱ्या व्यक्तींना बेल्स पाल्सी होण्याचा धोका दुप्पट असतो. बेल्स पाल्सीमध्ये चेहऱ्यावर लकवा मारण्याचे कारण बनते. आपल्या शरीरातील मज्जातंतूंना प्रभावित करते, ज्या चेहऱ्याच्या स्नायूंना नियंत्रणात ठेवतात.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Edited By - Komal Damudre

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com