Kitchen sink Vastu saam tv
लाईफस्टाईल

Kitchen sink Vastu: तुमच्याही सिंक चुकीच्या दिशेला आहे का? वास्तूशास्त्रानुसार जाणून घ्या किचनमध्ये सिंकची योग्य जागा

Right direction for kitchen sink: वास्तुशास्त्रानुसार किचनमध्ये सिंक कोणत्या दिशेला असावे? ईशान्य आणि नैऋत्य दिशेबाबतचे नियम, गॅस शेगडीपासून सिंकचे अंतर, सिंकखाली कचरापेटी ठेवण्याचे परिणाम आणि गळणाऱ्या नळाबाबतच्या महत्त्वाच्या टिप्स जाणून घ्या.

Surabhi Jayashree Jagdish

वास्तुशास्त्रानुसार घरातील स्वयंपाकघराला विशेष महत्त्व आहे. कारण याच ठिकाणी संपूर्ण कुटुंबासाठी जेवण तयार केलं जातं. आपण जे अन्न खातो त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर, विचारांवर आणि ऊर्जेवर होत असतो, अशी वास्तुशास्त्रात मान्यता आहे. त्यामुळे स्वयंपाकघराची रचना योग्य असणं महत्त्वाचे मानले जाते. स्वयंपाकघरात वास्तुदोष असल्यास घरात तणाव, आजारपण आणि पैशांच्या अडचणी वाढू शकतात, असं म्हटलं जातं.

अनेकदा घरातील किचन तयार करताना सिंक चुकीच्या ठिकाणी बसवलं जातं. भाजी धुण्यापासून ते भांडी स्वच्छ करण्यापर्यंत अनेक कामांसाठी सिंकचा वापर होतो. त्यामुळे किचनमध्ये सिंक नेमके कोणत्या दिशेला असावं, याबाबत वास्तुशास्त्रात काही नियम सांगितले आहेत.

किचनमध्ये सिंक कोणत्या दिशेला असावं?

वास्तुशास्त्रानुसार, स्वयंपाकघरातील सिंक ईशान्य दिशेला म्हणजेच उत्तर आणि पूर्व यांच्या मधल्या कोपऱ्यात असावं. या दिशेला सिंक ठेवल्याने घरात सुख-समृद्धी येते, अशी मान्यता आहे. त्याचप्रमाणे सिंकचा नळ आणि त्याचा वापर करताना तोंड उत्तर दिशेला असेल याची काळजी घ्यावी. म्हणजेच भांडी धुताना आपलं तोंड उत्तर दिशेला असणं योग्य मानलं जातं.

या दिशेला सिंक ठेवणं टाळा

वास्तुशास्त्रानुसार, घराच्या दक्षिण-पश्चिम दिशेला म्हणजेच नैऋत्य कोपऱ्यात किचन सिंक ठेवू नये. या दिशेला सिंक असल्यास घरातील लोकांमध्ये वाद होऊ शकतात. त्याचप्रमाणे घरात आर्थिक अडचणी निर्माण होऊ शकतात, असं वास्तुशास्त्रात सांगितलं जातं.

गॅस शेगडीच्या अगदी जवळ सिंक नको

किचनमध्ये गॅस शेगडी आणि सिंक एकमेकांच्या अगदी जवळ नसावेत. वास्तुशास्त्रानुसार, गॅस शेगडीचा संबंध अग्नी तत्त्वाशी, तर सिंकचा संबंध जल तत्त्वाशी आहे. ही दोन्ही तत्त्वं एकमेकांच्या विरुद्ध मानली जातात. त्यामुळे शेगडी आणि सिंक जवळ असल्यास घरातील आनंदावर परिणाम होऊ शकतो.

सिंकखाली कचऱ्याचा डबा ठेवू नका

किचनमधील सिंकखाली कचरापेटी ठेवणं टाळावं. त्याचप्रमाणे या ठिकाणी कचरा साचू देऊ नये. असं केल्याने घरात नकारात्मकता वाढते, असं वास्तुशास्त्रात मानण्यात आलं आहे. याशिवाय सिंक अशा ठिकाणी असावं, जिथून लिव्हिंग रूम म्हणजेच घरातील बसण्याची जागा दिसणार नाही.

सिंकचा नळ खराब असल्यास वेळीच दुरुस्त करा

किचनमधील सिंकचा नळ नेहमी व्यवस्थित असावा. नळातून सतत पाणी गळत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. नळातून पाणी टपकत राहणार नाही, याची काळजी घ्यावी.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती वास्तू शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sharad Kapoor: प्रसिद्ध अभिनेत्याची वाईट अवस्था; गंभीर उपचार सुरू, आठवडाभर बेड रेस्टवर, फोनही राहणार बंद

Political News: मुख्यमंत्र्यांना मातृशोक, ९१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; राजकीय वर्तुळात हळहळ

Maharashtra News Live Update: पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दौरा तूर्तास रद्द; १२ डिसेंबरला शरद पवारांच्या हस्ते प्रेरणास्थळाचे उद्घाटन

Mumbai : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचं काम २ वर्ष राखडलं, कारण आलं समोर

Pregnancy Tips : नॉर्मल डिलिव्हरीसाठी गर्भवती महिलांनी खावे हे फळ; स्त्रीरोगतज्ज्ञांनी सांगितले फायदे

SCROLL FOR NEXT