Mumbai : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचं काम २ वर्ष राखडलं, कारण आलं समोर

Mumbai Indu Mill Babasaheb Aambedkar Statue : मुंबईतील इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे काम रखडले आहे. पुतळ्याचे काम सहा महिन्यांपासून बंद असून स्मारक पूर्ण होण्यासाठी आणखी दोन वर्षे लागण्याची शक्यता आहे.

मुंबईतील इंदू मिल परिसरात उभारण्यात येत असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य स्मारकाचं अद्यापही काम अपूर्णच आहे. यंदाच्या वर्षात या स्मारकाचे काम पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, गेल्या सहा महिन्यांपासून बाबासाहेबांच्या पुतळ्याचे काम बंद असल्याने स्मारकाच्या पूर्णत्वाबाबत प्रश्न निर्माण झाला आहे. आता हे काम पूर्ण होण्यासाठी आणखी दोन वर्षे लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

या प्रकल्पाला उशीर होण्यामागे आखाती देशांमधील युद्धाचा परिणाम असल्याचे सांगितले जात आहे. युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात तांबे आणि एलपीजी गॅसच्या किमती वाढल्या आहेत. परिणामी, पुतळा तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कांस्य धातूची किंमतही वाढली आहे. त्यामुळे संपूर्ण प्रकल्पाचा खर्च वाढला आहे. वाढलेल्या खर्चासाठी राज्य सरकारकडे ३५० कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी मागण्यात आला आहे. मात्र, या वाढीव खर्चाच्या प्रस्तावाला अद्याप मंजुरी मिळालेली नसल्याने पुतळ्याचे काम रखडले आहे. सरकारच्या निर्णयाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या स्मारकाचे काम पूर्ण करण्यासाठी सरकारकडून प्रयत्न होणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.