migraine in children saam tv
लाईफस्टाईल

Child Migraine: तुमच्या मुलांचं वारंवार डोकं दुखतंय अन् भूक कमी लागतेय? या आजाराची असू शकतात कारणे

Migraine Awareness: लहान मुलांना वारंवार डोकेदुखीचा त्रास होत असेल, तर ती साधी डोकेदुखी नसून मायग्रेन असू शकते. तज्ज्ञ सांगतात या आजारामागील खरे कारण आणि लवकर निदानाचे महत्त्व.

Sakshi Sunil Jadhav

मुलांमधील मायग्रेन हा एक वाढता आरोग्यविषयक प्रश्न बनला आहे. बरेच पालक आपल्या मुलांच्या वारंवार होणाऱ्या डोकेदुखीकडे दुर्लक्ष करतात. मात्र ही साधी डोकेदुखी नसून मायग्रेनचा संकेत असू शकतो असा इशारा अपोलो हॉस्पिटल, हैदराबादचे न्यूरोलॉजिस्ट डॉ. सुधीर कुमार यांनी दिला आहे.

डॉ. कुमार यांच्या मते, सुमारे ८ ते १० टक्के शालेय वयोगटातील मुलांना मायग्रेनचा त्रास होतो. तर किशोरवयीन मुलांमध्ये हा धोका २० टक्क्यांपर्यंत वाढतो. मायग्रेनचा झटका काही वेळा लहान वयात, म्हणजेच प्री-स्कूल वयातही दिसू शकतो. लहान मुलांना आपली लक्षणं नीट सांगता येत नसल्यामुळे या अवस्थेचं निदान करणे आव्हानात्मक ठरतं.

लिंग आणि हार्मोनल बदलांचा प्रभाव

प्युबर्टीपूर्व काळात मुलं आणि मुली या दोघांनाही मायग्रेनचा त्रास जवळपास सारख्याच प्रमाणात होतो. मात्र, प्युबर्टीनंतर मुलींमध्ये हा त्रास जास्त प्रमाणात वाढतो. कारण हार्मोनल बदल हे त्यामागचे प्रमुख कारण असते. मुलांमध्ये तो साधारणतः १ ते २ तासांपर्यंतच राहतो. मुलांना दोन्ही कपाळाच्या बाजूंना किंवा डोक्याच्या पुढच्या भागात वेदना होतात. उलटी, मळमळ आणि पोटदुखी ही लक्षणंही मुलांमध्ये अधिक प्रमाणात दिसतात, ज्यामुळे या आजाराचं निदान आणखी कठीण होतं.

मायग्रेनचे सामान्य ट्रिगर्स

मुलांमधील मायग्रेनचे ट्रिगर्स म्हणजेच कारणं मोठ्यांप्रमाणेच असतात, मात्र भावनिक आणि जीवनशैलीतील घटक यांचा प्रभाव जास्त दिसतो. झोपेचं प्रमाण कमी-जास्त होणं, जेवण न घेणं, ताण, परीक्षेचं दडपण, dehydration ही काही प्रमुख कारणं आहेत.

तसेच चॉकलेट, चीज, प्रोसेस्ड मांस, कॅफिनयुक्त पेयं, तेज प्रकाश, मोठा आवाज, जास्त वेळ स्क्रीनकडे पाहणं, प्रवास किंवा वातावरणातील बदल हे देखील डोकेदुखी वाढवू शकतात. किशोरवयात हार्मोनल बदल हे देखील महत्त्वाचे ट्रिगर्स ठरतात.

डॉ. सुधीर कुमार यांच्या मते, मायग्रेन हा केवळ साधा डोकेदुखीचा आजार नसून एक न्यूरोलॉजिकल स्थिती आहे. वेळेत निदान, योग्य उपचार आणि जीवनशैलीतील सुधारणा केल्यास मुलांचं आरोग्य आणि त्यांच्या दैनंदिन जीवनाची गुणवत्ता सुधारू शकते. म्हणूनच, तुमचं मूल वारंवार डोकेदुखीची तक्रार करत असेल तर ती दुर्लक्ष न करता तज्ज्ञांचा सल्ला घ्या. लवकर ओळखल्यास मायग्रेनचं व्यवस्थापन सोपं आणि प्रभावी ठरू शकतं.

मुलांमध्ये मायग्रेन का वाढत आहे?

ताण, झोपेचा अभाव, स्क्रीन टाइम, हार्मोनल बदल आणि आहारातील अनियमितता ही प्रमुख कारणं आहेत.

मायग्रेनची लक्षणं मुलांमध्ये कशी ओळखायची?

वारंवार डोकेदुखी, मळमळ, उलटी, पोटदुखी, प्रकाश किंवा आवाजाची संवेदनशीलता ही सामान्य लक्षणं आहेत.

मुलांमधील मायग्रेनसाठी काय उपाय करावेत?

योग्य निदान, पुरेशी झोप, संतुलित आहार, आणि स्क्रीन टाइम कमी करणे उपयोगी ठरते.

डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा?

जर मुलाला वारंवार डोकेदुखी, शाळेत अडथळे किंवा मळमळ होत असेल तर त्वरित न्यूरोलॉजिस्टचा सल्ला घ्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : आई-वडिलांच्या भेटीची आस अपूर्णच राहिली; कॅनडात भारतीय तरुणीचा दुर्दैवी अंत

Phaltan Doctor Death: फलटण टू बीड व्हाया पंढरपूर; ४८ तासात PSI गोपाल बदने कुठं-कुठं लपला?

भाजपला शिवसेना ठाकरे गटाकडून धक्का! २ बड्या नेत्यांसह २९ जणांनी कमळाची साथ सोडली

Dark Neck Remedy: मान अचानक काळीकुट्ट पडलीये? टेन्शन सोडा! फक्त फॉलो करा या टिप्स

Amruta Dhongade Photos: अमृताचा बोल्ड लूक, फोटोंनी इंटरनेटचं वातावरण तापलं

SCROLL FOR NEXT