Sakshi Sunil Jadhav
महाराष्ट्रातील गणेश भक्तांसाठी अष्टविनायक यात्रा ही एक अत्यंत पवित्र आणि लोकप्रिय यात्रा मानली जाते. पुणे जिल्ह्यातील आठ प्रमुख गणपती मंदिरे एकत्र येऊन ही यात्रा पूर्ण होते.
भक्तांनी ही यात्रा ठरावीक क्रमाने आणि श्रद्धेने पूर्ण केली तर ती अत्यंत पुण्यप्रद मानली जाते. चला जाणून घेऊया या यात्रेची संपूर्ण माहिती.
अष्टविनायक म्हणजे आठ गणपतींचे दर्शन घेणे. त्यामध्ये मोरेश्वर, सिद्धिविनायक, बल्लाळेश्वर, वरदविनायक, चिंतामणि, गिरिजात्मज, विघ्नेश्वर, महागणपती ही गणपतीची रुपं आहेत.
यात्रेची सुरुवात मोरेश्वर, मोरगाव येथून केली जाते आणि शेवटही याच ठिकाणी केला जातो. पुण्याहून प्रवास सुरू करणे सर्वात सोयीस्कर मानले जाते.
संपूर्ण अष्टविनायक यात्रा पूर्ण करण्यास ३ ते ४ दिवस लागतात. जर तुम्ही स्वतःचे वाहन वापरत असाल, तर ३ दिवसांतही पूर्ण करता येते.
प्रत्येक गणपती मंदिराजवळ धर्मशाळा, भक्तनिवास आणि हॉटेल्सची सोय आहे. हिवाळा व पावसाळा हे प्रवासासाठी उत्तम ऋतू मानले जातात.
अष्टविनायक मार्गावर असंख्य भोजनालये आणि नाश्त्याची ठिकाणं आहेत. पाली आणि ओझर येथे शुद्ध शाकाहारी भोजन उपलब्ध असते.