पांढरा भात रक्तातील साखर वाढवतो.
पराठे जास्त तेलामुळे चरबी वाढवतात.
डाळीत अतिरिक्त तेल आरोग्यास हानीकारक आहे.
भारतीय घरांमध्ये नाश्त्याला अनेक पदार्थ रोज बनवले जातात आणि खाल्ले जातात. बाहेरून पाहायला ते सगळे पौष्टिक वाटतात, पण काही पदार्थ वारंवार किंवा जास्त प्रमाणात खाल्ले तर शरीराला हानी पोहोचवतात. हे समजून घेतल्याने चव न गमावता आरोग्यासाठी योग्य पर्याय निवडता येतात.
पांढरा भात हलका, मऊ आणि पटकन शिजतो. त्यामुळे तो बहुतेक घरात रोज खाल्ला जातो. पण त्यात तंतुमय पदार्थ (फायबर) फारच कमी असतात. तो पटकन रक्तातील साखर वाढवतो आणि थोड्याच वेळात पुन्हा भूक लागते. त्यामुळे वजन वाढण्याचा धोका असतो. याऐवजी ब्राऊन राईस किंवा बाजरी, नाचणीसारखी मिलेट्स खाल्ल्यास पोट जास्त वेळ भरलेले राहते.
पराठा चविष्ट आणि पोटभर वाटतो पण तो बहुतेक वेळा भरपूर तेल किंवा तुपात शिजलेला असतो. त्यामुळे शरीरात अतिरिक्त चरबी जमा होते. ही चरबी कोलेस्ट्रॉल वाढवते. त्याऐवजी साधी गव्हाची चपाती आणि भाज्या खाल्ल्यास तो हलका पण पोटभर पर्याय ठरतो.
डाळ ही प्रोटीनचा चांगला स्रोत आहे आणि साधारणतः आरोग्यदायी मानली जाते. पण ज्यावेळी ती जास्त तेल किंवा तुपात बनवली जाते, तेव्हा ती पचायला जड होते आणि जास्त कॅलरीज देते. डाळ हलकी आणि पौष्टिक ठेवण्यासाठी कमी तेलात आणि तुपाशिवाय बनवणे योग्य आहे.
समोसा, भुजिया यांसारखे पदार्थ सर्वत्र आवडीने खाल्ले जातात. पण ते खोल तळलेले असल्याने त्यात खूप चरबी आणि मीठ असते. यामुळे खराब कोलेस्ट्रॉल वाढतं आणि हृदयाला धोका निर्माण होतो.
पॅकेटवर फळांपासून बनवलेला ज्यूस असं लिहिलेलं दिसलं तरी बहुतांश रसात फळांपेक्षा साखरच जास्त असते. ही साखर दातांना हानी पोहोचवते आणि रक्तातील साखरही पटकन वाढवते. ताजी फळं खाणं किंवा घरगुती रस बनवून पिणे हेच उत्तम.
पापड हा भारतीय जेवणात बहुतेक वेळा साईड डिश म्हणून दिला जातो. पण त्यात मीठ खूप जास्त असते आणि तो तळला तर तेलही जास्त जाते. रोज खाल्ल्यास जास्त मीठामुळे रक्तदाब वाढतो आणि हृदयाला त्रास होऊ शकतो. याऐवजी भाजलेला पापड खाणं किंवा ताज्या काकडीच्या फोडी वापरणं हा अधिक चांगला पर्याय आहे.
पांढरा भात आरोग्यासाठी का हानिकारक आहे?
पांढरा भात रक्तातील साखर पटकन वाढवतो आणि वजन वाढवतो.
पराठ्याच्या आरोग्यदायी पर्यायात कोणते पदार्थ येतात?
साधी चपाती आणि भाज्या हा हलका पर्याय आहे.
डाळ कशी आरोग्यदायी ठेवावी?
कमी तेल आणि तुपाशिवाय डाळ बनवावी.
पॅकबंद फ्रुट ज्युसमध्ये काय जास्त असते?
पॅकबंद ज्युसमध्ये फळांपेक्षा साखर जास्त असते.
पापडाचा आरोग्यावर कोणता वाईट परिणाम होतो?
जास्त मीठ आणि तेलामुळे रक्तदाब वाढतो.
डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.