Piles Hemorrhoids Symptoms  Saam Tv
लाईफस्टाईल

Piles Hemorrhoids Symptoms : गुद्दद्वारामध्ये गाठ व ब्लिडिंग होतेय ? असू शकते मुळव्याध्याचे लक्षण, जाणून घ्या

गुद्दद्वारामध्ये गाठ आणि पोट साफ करताना ब्लीडिंग होणे हे मुळव्याधाचे सामान्य लक्षण आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Piles Hemorrhoids Symptoms : गुद्दद्वारामध्ये गाठ आणि पोट साफ करताना ब्लीडिंग होणे हे मुळव्याधाचे सामान्य लक्षण आहे. परंतु तुम्हाला हे माहित आहे का की , कॉलरेक्टर कॅन्सरची सुरुवातीची लक्षणे मुळव्याधाचे लक्षणांसारखीच आहेत. म्हणजेच मोठे आतडे किंवा गुद्दद्वारा मध्ये विकसित होणाऱ्या कर्करोगाला कोलोरेक्टल कॅन्सर असे म्हणतात.

ज्या कारणामुळे अनेक लोक या कोलोरेक्टल कॅन्सरचे (Cancer) आणि मुळव्याधाचे अनेक लक्षणे एकसारखे असतात. कॅन्सरला सुरुवातीमध्ये पाइल्स समजतात आणि समस्या जास्त प्रमाणात वाढू लागते. परंतु काही लक्षणे (Symptoms) असे सुद्धा आहेत, जे कोलन आणि रेक्टल कॅन्सर सारखे मिळते जुळते असतात.

1. गुदद्वारामध्ये गाठ होणे -

आतड्यांचा व मलाशयाचा कॅन्सर असो किंवा पाइल्स असो, या दोन्ही आजारांमध्ये गुदद्वारामध्ये गाठ आढळून येते. या गाठीमुळे गुद्दद्वाराच्या जागी खाज येणे आणि भरपूर प्रमाणात दुखणे अशा प्रकरच्या समस्यांना सामोरे जावे लागते.

2. ब्लीडिंग रंग एक सारखा दिसतो -

मुळव्याध आणि रेक्टल कॅन्सर हे गुद्दाच्या अंतिम टोकापासून सुरू होते. दोन्हीपण समस्यांमध्ये मल त्याग करताना किंवा त्यानंतर ब्लीडिंग होते. जॉन हॉकिन्स मेडिसिन नुसार दोन्हीही कारणांमध्ये हलक्या लाल रंगाचा रक्तस्त्राव होतो. जर कॅन्सर कोलनच्या आतमध्ये झाला असेल तर, हा रंग गडद लाल असू शकतो.

3. पोट दुखी होण्याचे वेगळे लक्षण -

जॉन हॉपिंक्स यांच्या म्हणण्यानुसार जर ब्लीडिंग होण्यासोबत पोट देखील फुगत असेल किंवा पोट दुखणे, क्र्यांप यांसारख्या समस्या उद्भवत असतील तर, हे कॉलोरेक्टल कॅन्सरचे योग्य लक्षण असू शकते. कारण की, मुळव्याधामध्ये अशा समस्यांचा खतरा नसल्या समान असतो. अशातच मुळव्याधाची लक्षणे येऊन जाऊन असतात. परंतु या कॅन्सरची लक्षणे सतत सुरू असतात.

4. अचानक वजन कमी होणे -

पाइल्समध्ये वजन तेव्हाच कमी होते जेव्हा तुमच्या खाणपाणाच्या पद्धतीमध्ये चढउतार होतो. परंतु मलाशयामधील आतड्यांचा कॅन्सर अचानक वजन कमी झाल्याने होतो आणि तुम्ही स्वतःला कमजोर समजू लागता. ते सुद्धा तेव्हा, जेव्हा तुमची इटिंग हॅबिट आधीसारखीच असते.

5. डॉक्टरांकडे कधी जावे -

पोट साफ करताना ब्लीडिंग आणि दुखणे ही मुळव्याधाची अतिशय सामान्य लक्षणे आहेत. परंतु या मागचं खरं कारण काय आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. यामध्ये पाइल्स आणि कॅन्सरसारखा गंभीर आजार होण्यापासून तुम्ही स्वतःला वाचू शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: राज्यात शंभर टक्के पीक पाहणी होणार, सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश

Arattai App UPI: अरत्ताई अ‍ॅपवर लवकरच UPI सपोर्टसह होणार, जाणून घ्या खास फीचर्स

भूकंपामुळे मध्यरात्री जमीन हादरली, २६ जणांचा मृत्यू, लोकांचा आक्रोश अन् घर पडतानाचा व्हिडिओ

Rule Change: दिवाळी-दसऱ्याआधी महत्त्वाचे १५ बदल, तुमच्या आयुष्यावर होणार थेट परिणाम, वाचा सविस्तर

Kalyan : इंग्लिश स्कूलचा अजब फतवा; कपाळावर टिळा, टिकली; हातात राखी बांधण्यावर बंदी

SCROLL FOR NEXT