protein shake health awareness SAAM TV
लाईफस्टाईल

Protein shake cancer risk: वर्कआउटसाठी घेत असलेला प्रोटीन शेक ठरतोय जीवघेणा? कॅन्सरचा धोका असल्याचा तज्ज्ञांकडून खुलासा

protein shake health awareness: आजकाल व्यायाम करणारे अनेकजण प्रोटीन शेक नियमितपणे घेतात. मसल्स मजबूत करण्यासाठी आणि शरीराला ऊर्जा देण्यासाठी हे पेय लोकप्रिय झाले आहे.

Surabhi Jayashree Jagdish

आजकाल अनेक जण वजन कमी करण्याचा प्रयत्न करतात. यासाठी जीम लावणं आणि प्रोटीनचं सेवन यांचंही प्रमाण वाढलं आहे. जर तुम्हीही वजन कमी करण्याच्या नादात प्रोटीन बार्स किंवा प्रोटीन शेक पिताय का? तर सावध व्हा, कारण यामुळे कॅन्सर होत असल्याचा धोका निर्माण झाला आहे.

प्रोटीन बार्स आणि पावडर आता हळूहळू दैनंदिन जीवनाचा भाग बनलेत. आरोग्य आणि ताकद वाढवण्यासाठी सोयीस्कर उपाय म्हणून प्रोटीनकडे पाहिलं जातं. पण हे प्रोटीन तुमच्या आरोग्यावर घातक परिणाम करत असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

प्रोटीनची कोणाला असते गरज?

अपोलो हॉस्पिटल्समधील चीफ डायटिशियन डॉ. हरिता श्याम यांनी सांगितलं की, जे प्रोटीन बार्स आणि शेक्स वापरले जातात ते आरोग्यासाठी उपयुक्त असतात. मात्र या गोष्टी खेळाडू, बॉडीबिल्डर्स, स्नायूंची घट झालेल्या वृद्ध व्यक्ती, शस्त्रक्रिया झालेले रुग्ण किंवा ज्यांच्यामध्ये काही कमतरता आहे अशा व्यक्तींना याची जास्त गरज असते. मात्र सरासरी निरोगी प्रौढ व्यक्ती ज्यांचा भारतीय आहार संतुलित आहे त्यांना या प्रोटीनची गरज नसते. अशा व्यक्तींसाछी याचा नियमित वापर अधिक हानीकारक ठरू शकतो.”

यशोदा हॉस्पिटल्सचे वरिष्ठ कन्सल्टंट मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट आणि हेमॅटो ऑन्कोलॉजिस्ट डॉ. सुमंत कुमार मल्लुपट्टू यांनी सांगितलं की, animal-based protein सप्लिमेंट्सचा जास्त आणि दीर्घकालीन वापर केल्यास कोलन कॅन्सरचा धोका संभवतो. प्रोटीन मेटाबॉलिझमदरम्यान तयार होणाऱ्या टॉक्सिन्समुळे तुमच्या आतड्यांमध्ये सूज येते. ज्यामुळे तुम्हाला कॅन्सर होण्याची शक्यता वाढते.

डॉ. हरिता यांनी पुढे सांगितलं की, अनेक कमी दर्जाच्या प्रोटीन प्रोडक्ट्समध्ये जास्त प्रमाणात साखर, आर्टिफिशियल स्वीटनर्स, सिंथेटिक फ्लेवर्स, रंग, हायड्रोजनेटेड ऑइल्स आणि अयोग्य प्रमाणात हर्बल स्टिम्युलंट्स असतात. स्वस्त प्रोडक्ट्समध्ये शिसे आणि पारा यांसारख्या जड धातूंचे अंश आढळले आहेत. अशा घटकांमुळे आरोग्याला धोका निर्माण होतो. त्यामुळे प्रोटीनची खरेदी करताना लेबल वाचणं गरजेचं आहे.”

किडनीच्या आजारांचाही धोका वाढतो

काही प्रोटीन्समध्ये आढळलेले शिसं, कॅडमियम, आर्सेनिक आणि पारा यांसारखे धातू शरीरात साचून न्यूरोलॉजिकल समस्या, किडनीचे आजार आणि कॅन्सरचा धोका वाढवू शकतात. अनेक बार्स आणि पावडरमध्ये कृत्रिम स्वीटनर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्ज आणि जास्त प्रमाणात साखर असते, जी दीर्घकाळ आरोग्यास हानीकारक ठरतं, डॉ. सुमंत यांनी सांगितलंय.

सप्लीमेंट्स निवडताना कोणती काळजी घ्यावी?

ज्यांना सप्लिमेंट्स घ्यायचेच असतील त्यांनी FSSAI ने अप्रुव केलेले, थर्ड-पार्टी टेस्टेड प्रोडक्ट्स घ्य्यावेत. ज्यामध्ये प्रोटीनमध्ये असलेल्या घटकांची यादी स्पष्ट असेल आणि अॅडिटिव्ह्ज कमी असतील. शिवाय हे घेताना डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुंबईच्या महालक्ष्मी मंदिर परिसरात बेवारस बॅग सापडल्याने गोंधळ

बुरशी लागलेला कांदा खाताय, सावधान! कांद्यात जीवघेणं ब्लॅक फंगस?

येत्या २ महिन्यात राज्याचा CM बदलणार? महाराष्ट्रातील बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ

भाजप- शिंदेसेनेचं पुन्हा फिस्कटणार? 13 महापालिकांवरून महायुतीत रस्सीखेच

Raigad : विद्यार्थिनी अलिबागहून महाडला स्पर्धेत आली, अचानक शाळेच्या मैदानात कोसळून मृत्यू

SCROLL FOR NEXT