Paracetamol in Pregnancy May Affect Fetal Growth Saam TV Marathi news
लाईफस्टाईल

Paracetamol : गरोदरपणात पॅरासिटामोल खाताय? त्याआधी ही बातमी वाचाच

Paracetamol risks for baby : गरोदरपणात अनेक महिला पॅरासिटमोल गोळी घेतात. अंगदुखी, डोकेदुखीपासून आराम मिळण्यासाठी कोणत्याही सल्ल्याशिवाय ही गोळी घेतली जाते, पण याचा परिणाम गर्भातील बाळावर होतो, असे संशोधनात समोर आलेय.

Namdeo Kumbhar

  • गरोदरपणात पॅरासिटामोल घेतल्यास गर्भातील बाळाच्या मेंदूवर वाईट परिणाम होऊ शकतो.

  • Autism आणि ADHD सारख्या विकासात्मक विकारांचा धोका वाढतो.

  • पॅरासिटामोलमुळे शारीरिक आणि प्रजनन विकासातही अडथळा येऊ शकतो.

  • गरोदर महिलांनी औषध फक्त डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावे.

Side effects of paracetamol on fetal brain development : सर्दी, ताप अथवा वेदना कमी करण्यासाठी सर्रास पॅरासिटामोल गोळी घेतली जाते. कारण, त्याचा जास्त फायदा होतो आणि डॉक्टरकडे न जाता आपण लवकर बरे होतो. गरोधरपणातही काहीजण पॅरासिटामोल गोळी घेतात. कधी डॉक्टरांच्या सल्ल्याने किंवा कधी स्वत:च्या मनाने गोळी खाल्ली जाते. पण गरोदरपणात पॅरासिटामोल खात असाल तर धोकेही तितकेच आहे. ताज्या अभ्यासानुसार, गरोदरपणात पॅरासिटामोल खात असाल तर त्याचा परिणाम तुमच्या गर्भातील बाळाच्या मेंदूवर परिणाम होऊ शकतो. गरोदरपणात अनेक महिलांना ताप, सर्दी, अंगदुखी अथवा डोकेदुखी यासारख्या समस्या होता. आशावेळी अनेक महिला पॅरासिटामोल खातात. पण संशोधकांच्या मते गरोदर असताना पॅरासिटामोल खाल्ल्यास बाळावर वाईट परिणाम होतो. गंभीर आजार होण्याची शक्यता आहे. (Is paracetamol safe during pregnancy research findings)

डोकेदुखी, दातदुखी, सर्दी, अंगदुखी अथवा फ्लूपासून आराम मिळण्यासाठी डॉक्टर स्वतः पॅरासिटामोल घेण्याची शिफारस करतात. ताप कमी करण्यासाठी पॅरासिटामोलचा वापर सध्या मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मात्र या गोळीचे गंभीर परिणाम होतात. विशेषता गर्भातील बाळावर याचा परिणाम जास्त प्रमाणात होतो. गरोदरपणात पॅरासिटामोल घेतली, तर बाळाच्या मेंदूचा विकास खुंटण्याची शक्यता आहे. पॅरासिटामोल सुरक्षित मानली जात असली तरी, गरोदरपणात तिचा वापर काहीवेळा काळजीपूर्वक करावा लागतो. शक्य असेल तर गरोदरपणात पॅरासिटामोल गोळीचा वापर टाळलेलाच बरा.

संशोधनात नेमकं काय आहे ?

अमेरिकेतली माउंट सिनाई येथील इकान स्कूल ऑफ मेडिसिनमध्ये पॅरासिटामोलवर संशोधन झालेय. वेगवेगळ्या देशात तब्बल ३६ ठिकाणी यावर संशोधन केल्यानंतर विश्लेषण समोर आलेय. एक लाखांपेक्षा जास्त महिलांवर याबाबत संशोधन करण्यात आलेय. संशोधनातील निष्कर्ष डोळे उघडणारे आहे. Paracetamol in pregnancy linked to autism and ADHD risk

गर्भावस्थेदरम्यान पॅरासिटामोल घेणाऱ्या महिलांच्या मुलांना ऑटिझम (Autism Spectrum Disorder) आणि अटेंशन डेफिसिट हायपर अ‍ॅक्टिव्हिटी डिसऑर्डर (ADHD) यासारख्या मज्जासंस्थेशी संबंधित विकासात्मक समस्यांचा धोका जास्त असतो, असे संशोधनातून समोर आलेय.

पॅरासिटामोलचा गर्भातील बाळावर काय परिणाम होतो? Doctors caution on paracetamol use during pregnancy

पॅरासिटामोल वापरण्यासाठी सुरक्षित मानले जाते, पण या गोळीचा बाळावर गंभीर परिणाम होतो. बाळाच्या मेंदूचा विकास खुंटला जाऊ शकतो. तज्ज्ञांच्या मते, गर्भवती असताना पॅरासिटामोल घेतली, तर त्याचा थेट परिणाम बाळावर होतो. त्यामुळे बाळाच्या मेंदूचा विकास होण्यासही अडथळा होऊ शकतो.

पॅरासिटामोल घेतल्यास शरीरातील पेशींना हानी पोहोचते आणि गर्भाच्या अवयवांच्या सामान्य विकासाला अडथळा आणू शकते. पॅरासिटामोल हार्मोन्सच्या नैसर्गिक कार्यप्रणालीवर परिणाम करू शकते. बाळाच्या मेंदू आणि प्रजनन प्रणालीसाठी आवश्यक आहे.

काही तज्ज्ञांच्या मते गरोदरपणात पॅरासिटामोलचा अतिवापर मुलांमध्ये प्रजनन आणि मूत्रजननांगी विकारांचा धोका वाढवू शकतो. याचा अर्थ असा की याचा केवळ मानसिक विकासावरच नव्हे, तर शारीरिक विकासावरही परिणाम होऊ शकतो. दरम्यान, या संशोधनानुसार, गर्भावस्थेदरम्यान औषधांच्या वापराबाबत अधिक सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.

गर्भवती महिलांनी काय करावे?

गरोदर असताना डोकेदुखी, ताप, अंगदुखी यासारख्या समस्या होऊ शकतात. पण यापासून आराम मिळावा म्हणून पॅरासिमोल घेतल जाते. पण पॅरासिटामोल पूर्णपणे सुरक्षित नाही. त्यामुळे शक्य तर याचा वापर टाळावा. गर्भवती महिलेने डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही औषध घेऊ नये. ताप किंवा अंगदुखी जास्त असेल तर तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधावा आणि त्यांच्या सूचनांनुसारच औषध घ्यावे.

FAQ on Paracetamol Tablet in Marathi

गरोदरपणात पॅरासिटामोल घेणं धोकादायक का आहे?

संशोधनानुसार, पॅरासिटामोल घेतल्यास गर्भातील बाळाच्या मेंदूचा विकास खुंटू शकतो आणि Autism, ADHD सारखे विकार होऊ शकतात.

पॅरासिटामोलवरील संशोधनातून नेमकं काय निष्पन्न झालं?

एक लाखांहून अधिक महिलांवर केलेल्या अभ्यासात, पॅरासिटामोल घेतलेल्या महिलांच्या बाळांना मज्जासंस्थेशी संबंधित समस्या जास्त प्रमाणात दिसल्या.

पॅरासिटामोल घेतल्यास गर्भातील बाळावर आणखी काय परिणाम होऊ शकतो?

मेंदूच्या विकासासोबतच प्रजनन आणि मूत्रजननांगी विकार होण्याची शक्यता वाढते.

गरोदरपणात महिलांनी काय करावे?

कोणतेही औषध डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेऊ नये. ताप किंवा वेदना असल्यास तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधावा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dahihandi 2025 : दहीहंडीमध्ये २ गोविंदाचा मृत्यू; ९५ जण जखमी, कोणत्या हॉस्पिटलमध्ये किती जण अॅडमिट, जाणून घ्या

Mumbai Lake Water Level : मुंबईकरांसाठी खूशखबर! तुळशी तलाव ओव्हरफ्लो, ७ तलावात किती पाणीपुरवठा?

Konkan Railway: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; रेल्वेनं घेतला मोठा निर्णय

Ajit Pawar Rohit Pawar : अजित पवार विरूद्ध रोहित पवार, दादांचा पुतण्याला दम

Mumbai Dahi Handi 2025 : मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट; आणखी एका गोविंदाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT