green coffee for weight loss google
लाईफस्टाईल

Green Coffee: वजन कमी करण्यासाठी ग्रीन कॉफीचे सेवन योग्य की अयोग्य? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला

Weight Loss Tips: ग्रीन कॉफी वजन कमी करण्यासाठी उपयुक्त मानली जाते, पण तिचे दुष्परिणामही गंभीर असू शकतात. तज्ज्ञ सांगतात की नैसर्गिक उपाय आणि संतुलित आहारच सुरक्षित वजन घटवू शकतात.

Sakshi Sunil Jadhav

सोशल मीडियाच्या वापरामुळे कोण काय आणि कधी खातयं? हे आपल्याला समजतं. त्यातच लोक वजन कमी करण्यासाठी विविध उपाय, व्यायाम आणि डाएट फुड्सबद्दल माहिती देत असतात. सध्या बाजारात डाएट आणि स्लिमिंगसाठी ग्रीन कॉफीचे सेवन करतात. मात्र तज्ज्ञांच्या मते ग्रीन कॉफी जितकी फायदेशीर मानली जाते तितकीच ती आरोग्यासाठी धोकादायकही ठरू शकते.

ग्रीन कॉफी म्हणजे कॉफीच्या बियांना न भासता तयार केली जाणारी कॉफी असते. यात क्लोरोजनिक अॅसिड नावाचा घटक असतो. ज्यामुळे मेटाबॉलिझम वाढतं आणि फॅट कमी होतो, असं सांगितलं जातं. पण याचं जास्त सेवन केल्याने शरीरावर गंभीर परिणाम होऊ शकतात.

तुम्ही जर सतत ग्रीन कॉफी पित असाल तर पचनाच्या समस्या, अॅसिडिटी, डोकेदुखी, तणाव आणि झोप न लागणे यांसारख्या अडचणींचा सामना करावा लागतो. यात कॅफिनचं प्रमाण जास्त असल्यामुळे हृदयाच्या ठोक्यांची गती अचानक वाढू शकते, रक्तदाब अनियंत्रित होऊ शकतो आणि कधीकधी हृदयाशी संबंधित धोक्याला सामोरं जावं लागतं. डायबिटीज, उच्च रक्तदाब किंवा किडनीच्या समस्या असणाऱ्या रुग्णांसाठी तर ग्रीन कॉफी घातक ठरू शकते.

तज्ज्ञ सांगतात की, वजन कमी करण्यासाठी फक्त ग्रीन कॉफीवर अवलंबून राहणं चुकीचं आहे. त्याऐवजी तुम्ही योग्य पौष्टीक आहार, नियमित व्यायाम, पुरेशी झोप आणि तणावमुक्त जीवनशैली याचे पालन करुन फायदे मिळवू शकता. थोडक्यात, ग्रीन कॉफीचे काही फायदे असले तरी ती जास्त प्रमाणात सेवन केल्याने शरीराला जास्त हानी पोहोचू शकते. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी नैसर्गिक मार्ग निवडणे फायदेशीर ठरते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पासवर्ड न टाकता WiFi करा कनेक्ट, ही आहे एकदम सोपी ट्रिक्स

Bigg Boss 19-Pranit More : प्रणित मोरे 'बिग बॉस १९' का जिंकला नाही? 'ही' आहेत कारणे

Maharashtra Live News Update: विरोधी पक्षनेतेपदाबाबत अफवा, अफवांवर विश्वास ठेवू नका - आदित्य ठाकरे

जनावरांच्या गोठ्यात चिमुकलीवर बलात्कार; नंतर नराधमानं धार्मिक स्थळाजवळ आयुष्य संपवलं

Black Spots Onion: काळे डाग अन् बुरशी लागलेला कांदा खावा का? आरोग्यासाठी किती घातक? जाणून घ्या!

SCROLL FOR NEXT