Constipation saam tv
लाईफस्टाईल

केवळ चुकीच्या आहारामुळे Constipation चा त्रास होतो? तज्ज्ञांनी स्पष्ट केले 'या' समस्येबाबत असलेले गैरसमज

पुण्यातील अंकुरा हॉस्पिटल फॉर वुमन अँड चिल्ड्रनमधील वरिष्ठ बालरोगतज्ञ आणि समुपदेशक डॉ. सीमा जोशी यांनी बद्धकोष्ठतेसंदर्भात काही गैरसमज समजावून दिले आहेत.

Surabhi Jayashree Jagdish

बद्धकोष्ठता म्हणजे एका आठवड्यापेक्षा जास्त काळ अनियमित आणि क्वचितच मल विसर्जन करणं. बद्धकोष्ठतेची लक्षणं म्हणजेच पोटात क्रॅम्स येणे, कडक मल, पोट फुगणं, आळस येणं आणि आतडे रिकामे करण्यास ताण येणं. मोठ्या संख्येने लोक बद्धकोष्ठतेची समस्या गांभीर्याने घेत नाहीत.

पुण्यातील अंकुरा हॉस्पिटल फॉर वुमन अँड चिल्ड्रनमधील वरिष्ठ बालरोगतज्ञ आणि समुपदेशक डॉ. सीमा जोशी यांनी बद्धकोष्ठतेसंदर्भात काही गैरसमज समजावून दिले आहेत. कोणते गैरसमज लोकांमध्ये असतात हे जाणून घेऊया.

गैरसमज - बद्धकोष्ठता ही सामान्यतः केवळ वयोवृद्धांमध्ये दिसून येते

वास्तविकता - जरी वयामुळे बद्धकोष्ठतेची शक्यता वाढते तरी त्याचा परिणाम मुले, प्रौढ आणि गर्भवती महिलांसह सर्व वयोगटातील लोकांवर होतो. सध्या, बहुतेक मुले आणि प्रौढ जंक आणि प्रक्रिया केलेले पदार्थांचे सेवन करतात ज्यामुळे बद्धकोष्ठता होऊ शकते.

गैरसमज - उच्च फायबरयुक्त अन्नाचे सेवन हे बद्धकोष्ठतेपासून आराम देते

वास्तविकता: आतड्यांच्या हालचालींवर नियंत्रण ठेवण्यासाठी आहारात फायबरचा समावेश करणे आवश्यक आहे. मात्र फायबरचे सेवन वाढल्याने दीर्घकालीन बद्धकोष्ठता दूर होऊ शकत नाही. जास्त प्रमाणात फायबरचे सेवन केल्यास सूज येणं आणि जठरांत्रातील अस्वस्थता यांसारखी लक्षणे दिसू शकतात. आहारात योग्य प्रमाणात फायबरचे प्रमाण असावे आणि यासाठी तज्ज्ञांकडून मार्गदर्शन घेणं योग्य आहे.

गैरसमज: लोकांनी बद्धकोष्ठतेबाबत काळजी करू नये कारण यामुळे किरकोळ गैरसोय होते

वास्तविकता: हे विधान चुकीचं असून बद्धकोष्ठता एखाद्या व्यक्तीच्या जीवनावर परिणाम करू शकते. ज्यामुळे अस्वस्थता, पोट फुगणे, पोटदुखी, मूळव्याध, गुदद्वारातील विकृती किंवा विष्ठा यावर योग्य वेळी उपचार न घेतल्यास त्रास होऊ शकतो. बद्धकोष्ठता मोठ्या संख्येने लोकांसाठी चिंताजनक आणि तणावपूर्ण ठरु शकते आणि त्वरित उपचारांची आवश्यकता भासते.

गैरसमज : बद्धकोष्ठता नियंत्रित करण्यासाठी औषधांचा वापर करावा लागतो

वास्तविकता: तात्पुरता आराम देण्यासाठी तज्ञांकडून औषधांची शिफारस केली जाते, परंतु त्याचा दीर्घकालीन वापर टाळण्याचा सल्ला दिला जातो. जीवनशैलीतील बदल आणि व्यायामामुळे बद्धकोष्ठता दूर होण्यास मदत होते.

गैरसमज : बद्धकोष्ठता फक्त चुकीच्या आहाराच्या सवयीमुळे होते

वास्तविकता: आहार महत्त्वाची भूमिका बजावत असताना, इतर घटक जसं की औषधांचे दुष्परिणाम, हार्मोनल असंतुलन, न्यूरोलॉजिकल स्थिती आणि पेल्विक फ्लोर डिसफंक्शन यांचा समावेश होतो. तुमच्यासाठी योग्य उपचार पद्धती निवडण्याकरिता तज्ञाचा सल्ला घेणं गरजेचं आहे.

Bihar News: उपमुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी; '२४ तासात स्रमाट चौधरी यांना गोळी घालेन'

Crime : चारित्र्याच्या संशयावरुन मारहाण, गर्भवती पत्नीचा मृत्यू; कुजलेल्या मृतदेहाजवळ तरुणाचे नको ते कृत्य

Nag Panchami: नागपंचमीला चुकूनही 'ही' कामे करु नका

Maharashtra Live News Update: नांदूर-मध्यमेश्वर धरणातून गोदावरी पत्रात पाण्याचा विसर्ग वाढवला

Shocking News : संतापजनक! राजकीय वाद टोकाला, महिला मध्यरात्री उठली अन्...

SCROLL FOR NEXT