लवकरच महाशिवरात्रीचा सण साजरा करण्यात येईल. महादेवांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी आहे. या दिवसात अनेकांना भगवान शंकराच्या विविध रुपांचे दर्शन घ्यायची इच्छा असते.
जर तुम्ही देखील दक्षिण भारतातील शंकराच्या मंदिरांना भेट द्यायचा विचार करत असाल तर IRCTC ने तुमच्यासाठी भन्नाट टूर प्लान आणला आहे. ज्यामध्ये शिवभक्तांना दक्षिण भारतातील धार्मिक स्थळांचे दर्शन करता येणार आहे. जाणून घेऊया खर्च (Price) किती येईल याविषयी.
1. महाशिवरात्री स्पेशल टूर पॅकेज
यंदा महाशिवरात्री ही ८ मार्च ला देशभरात साजरी केली जाईल. यानिमित्ताने IRCTC ने शिवभक्तांसाठी टूर प्लान आणला आहे. ३८ हजारांमध्ये तुम्ही मुंबईहून दक्षिण भारतात जाऊ शकतात. या टूर पॅकजेचे नाव आहे दक्षिण भारत-महाशिवरात्री (Mahashivratri) स्पेशल (WMA47A). हा टूर पॅकेज ७ मार्च ते १२ मार्च पर्यंत असणार आहे.
2. या ठिकाणी फिरता येईल
IRCTC झोनल ऑफिस मुंबईने दक्षिण भारत टूर आयोजित केली आहे. यामध्ये तुम्हाला मदुराई-रामेश्वरम-कन्याकुमारी-त्रिवेंद्रमला फिरता येईल. येथे तुम्हाला दक्षिण भारतातील पवित्र स्थळांना भेट देता येईल.
3. कशी असेल सुविधा
या टूर पॅकेजमध्ये तुम्हाला मुंबईहून विमानाने मदुराई, रामेश्वर, कन्याकुमारी, त्रिवेंद्रम, कोवलम या ठिकाणी फिरता येणार आहे. तसेच या टूर पॅकेजमध्ये हॉटेलची सुविधा, सकाळचा नाश्ता, दुपारचे आणि रात्रीचे जेवण करता येईल.
4. बुकिंग खर्च किती?
IRCTC च्या या टूर पॅकेजमध्ये तुम्ही एकट्याने प्रवास करत असाल तर ५१,१०० रुपये खर्च करावे लागतील.
कपल्स जात असतील तर प्रवासी खर्च हा प्रति व्यक्तीला ३९,६०० रुपये तर तीन व्यक्ती असल्यास प्रति व्यक्तीला ३८ हजार रुपये भरावे लागतील.
५ ते ११ वर्ष वयोगटातील मुलांसाठी ३३६०० रुपये बेडसह आणि २९३०० रुपये बेडशिवाय खर्च करावे लागतील.
5. कसे कराल बुक?
या टूर पॅकेजसाठी तुम्हाला IRCTC च्या अधिकृत वेबसाटला भेट द्यावी लागेल. त्यावरुन तिकीट बुक करता येईल. याशिवाय IRCTC पर्यटक सुविधा केंद्र, कार्यालयातूनही बुकिंग करता येईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.