IRCTC Maharashtra Tour Package Saam Tv
लाईफस्टाईल

Maharashtra Tour Package: IRCTC चं नवं टूर पॅकेज! कमी खर्चात अनुभवा निसर्गरम्य महाराष्ट्र; कशी कराल बुकिंग?

IRCTC Maharashtra Tour Package : जर तुम्ही महाराष्ट्रातील या ठिकाणांना भेट देण्याचा विचार करत असाल, तर IRCTC एक उत्तम संधी घेऊन आली आहे.

कोमल दामुद्रे

Details of IRCTC's Maharashtra Tour Package:

महाराष्ट्रात असे अनेक पर्यटन स्थळे आहेत ज्याविषयी आपल्याला माहीत असे पण खर्चाच्या अभावामुळे आपल्याला जाता येत नाही. मुंबईतील प्रसिद्ध व महाराष्ट्राला लाभेल गेटवे ऑफ इंडिया हे अतिशय सुंदर स्थळ आहे.

महाराष्ट्र आपल्या अफाट सौंदर्यामुळे पर्यटकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. त्यात असणारे औरंगाबाद विशेषतः प्राचीन किल्ले, गुहा आणि ऐतिहासिक इमारतींसाठी ओळखले जाते. औरंगाबादमध्ये एलोरा लेणी आहेत, ज्या देशातच नव्हे तर परदेशातही प्रसिद्ध आहेत.

एलोराच्या गुहेत भगवान शिवाची (Shiv) एक मोठी मूर्ती आहे. येथे 100 हून अधिक लेणी आहेत, परंतु केवळ 34 लेणी पर्यटकांसाठी खुली करण्यात आली आहेत, त्यामुळे जर तुम्ही या ठिकाणांना भेट देण्याचा विचार करत असाल, तर IRCTC एक उत्तम संधी घेऊन आली आहे. जर तुम्हालाही बजेटमध्ये (Budget) फिरायचे असेल तर याप्रकारे बुकिंग करु शकता.

1. पॅकेज तपशील

  • पॅकेजचे नाव- मार्व्हेल्स ऑफ महाराष्ट्र एक्स हैदराबाद

  • पॅकेज कालावधी- 3 रात्री आणि 4 दिवस

  • प्रवास मोड - फ्लाइट

  • कव्हर केलेले गंतव्य- औरंगाबाद, एलोरा, नाशिक, शिर्डी

2. ही सुविधा मिळेल

  • येण्या-जाण्यासाठी विमानाचे तिकीट मिळेल.

  • राहण्यासाठी हॉटेलची सुविधा असेल.

  • ३ दिवस नाश्त्याची सोय आणि 2 रात्रीच्या जेवणाची सोय असेल.

  • तुम्हाला ट्रॅव्हल इन्शुरन्सची सुविधा देखील मिळेल.

3. प्रवासासाठी किती शुल्क आकारले जाईल

  • या ट्रिपमध्ये तुम्ही एकटे प्रवास (Travel) करत असाल तर तुम्हाला 25,550 रुपये मोजावे लागतील.

  • त्याच वेळी, दोन लोकांना प्रति व्यक्ती 21,200 रुपये शुल्क द्यावे लागेल.

  • तीन लोकांना प्रति व्यक्ती 20,950 रुपये शुल्क भरावे लागेल.

  • मुलांसाठी तुम्हाला वेगळी फी भरावी लागेल. बेडसह 20,000 (5-11 वर्षे) आणि बेडशिवाय 12,150 रु.

4. IRCTC ने ट्विट करून माहिती दिली

IRCTC ने या टूर पॅकेजची माहिती देणारे ट्विट शेअर केले आहे. ज्यामध्ये तुम्हाला महाराष्ट्रातील सुंदर दृश्य पाहायचे असेल तर तुम्ही IRCTC च्या या अप्रतिम टूर पॅकेजचा लाभ घेऊ शकता.

5. अशा प्रकारे तुम्ही बुक करू शकता

तुम्ही या टूर पॅकेजसाठी IRCTC च्या अधिकृत वेबसाइटवरून बुक करू शकता. याशिवाय, IRCTC पर्यटक सुविधा केंद्र, क्षेत्रीय कार्यालये आणि प्रादेशिक कार्यालयांमधूनही बुकिंग करता येते. पॅकेजशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही IRCTC अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL 2025 Auction: IPL चा लिलाव किती वाजता सुरु होईल? समोर आली मोठी अपडेट

Maharashtra News Live Updates : छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन व्यावसायिकावर आयटीची छापेमारी

Kareena Kapoor: हटके स्टाईलमध्ये करिनाची एअरपोर्टवर एन्ट्री, सेल्फी काढायचा दिला नकार; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल,Video व्हायरल

Beed Politics: महायुतीमधील कलह चव्हाट्यावर, भाजप नेत्याचा थेट अजित पवारांना टोला

Pooja Sawant: 'कलरफुल' पूजा सावतचं मनमोहक सौंदर्य, फोटोंनी वाढवली काळजाची धडधड

SCROLL FOR NEXT