International Olympic Day 2022 ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक दिवस २०२२: जाणून घ्या महत्त्व, इतिहास व थीम

आपल्यापैकी बऱ्याच जणांना खेळ खेळण्यास किंवा ते पाहण्यास फार आवडते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : आपल्यापैकी बऱ्याच जणांना खेळ खेळण्यास किंवा ते पाहण्यास फार आवडते. त्याचे काही नियम व अटी आपल्याला बऱ्यापैकी माहित असतात. खेळ खेळल्याने आरोग्यासही अनेक फायदा (Benefits) होतो.

हे देखील पहा -

२३ जून हा दिवस जगभरात आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक दिवस म्हणून साजरा केला जातो. हा दिवस आधुनिक ऑलिंपिक खेळांच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. खेळांशी संबंधीत आपले आरोग्य सुदृढ राहावे यासाठी हा दिवस जगभरात साजरा करण्यात येतो. २३ जून १८९४ साली आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीची स्थापना करण्यात आली होती. त्यामुळे हा दिवस आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीची पायाभरणीचे प्रतीक आहे असे समजले जाते.

इतिहास

आंतरराष्ट्रीय खेळांमध्ये जागरुकता आणि सहभाग वाढवण्यासाठी स्टॉकहोममधील आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीच्या ४१ व्या अधिवेशनात डॉक्टर ग्रुस नावाच्या आयओसीच्या सदस्याने ऑलिंपिक दिवस साजरा करण्यात यावा अशी सूचना जाहिर करणारा अहवाल सादर केला. १९४७ मध्ये सादर केलेल्या या अहवालावर चर्चा करण्यात आली व १९४८ रोजी सेंट मॉरिट्झमधील ४२ व्या आयओसीच्या अधिवेशनात सूचना लागू करण्यात आल्या. १८९४ मध्ये पॅरिसमधील सॉर्बन येथे आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीची स्थापना करण्यात आली. त्यावेळी आयओसीचे अध्यक्ष सिगफ्रीड एडस्ट्रॉम यांच्या नेतृत्वाखाली जून मध्ये पहिला आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक दिवस साजरा करण्यात आला.

महत्त्व -

क्रीडाप्रेमींनी ऑलिंपिक खेळांमध्ये सहभागी होण्यासाठी आणि विविध क्रीडा (Game) स्पर्धांबद्दल जागरूकता पसरवण्यासाठी व त्याबाबतीत लोकांना प्रेरित आणि प्रोत्साहन करण्यासाठी हा दिवस साजरा करण्यात येतो. ऑलिंपिकच्या नियमांनुसार उत्कृष्टता, आदर आणि मैत्री या तीन मूल्यांवर लक्ष केंद्रित केले जाते. हा दिवस साजरा करण्यासाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीद्वारे अनेक उपक्रम आयोजित केले जातात.

थीम -

यंदाच्या वर्षी आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक दिनाची थीम ही जगासाठी शांततापूर्वक एकत्र येणे तसेच जगाला एकत्र आणण्यासाठी आणि खेळांडूमधील फरक कमी करण्यासाठी याचे प्रतिनिधित्व केले जाते.

Edited By - Komal Damudre

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ध्यास लागला रे विठ्ठलाच्या भेटीचा…! यंदा ‘या वारकरी दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान

Ashadhi Ekadashi : अवघे गरजे पंढरपूर…! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

SCROLL FOR NEXT