Instant Snack Recipe, Corn chat
Instant Snack Recipe, Corn chat Saam Tv
लाईफस्टाईल

Instant Snack Recipe : पाहुण्यांसाठी मसालेदार स्वीट कॉर्न चाट चा करा बेत, पहा रेसिपी

कोमल दामुद्रे

Instant Snack Recipe : पावसाळा म्हटलं की, मका हा हमखास खाल्ला जातो. भाजलेल्या बुट्ट्यापासून ते उकडलेल्या मक्याचे चव औरच ! मका लहानांपासून मोठ्यापर्यंत प्रत्येकाला आवडतो.

मक्याचे सेवन केल्याने शरीराला अनेक फायदे होतात. मका हा पित्त व वात कमी करण्यासाठी फायदेशीर (Benefits) आहे. मक्यामुळे शरीरातील कोलेस्ट्रॉलची मात्रा नियंत्रणात राहते.

स्वीट कॉर्न चाट हा उकडलेल्या स्वीट कॉर्नपासून बनवलेली डिश आहे, जी अतिशय खाण्यास चविष्ट व स्वादिष्ट आहे. बहुतेक लोकांना ही स्वीट कॉर्न चाट खायला आवडते. ऋतू कोणताही असो, प्रत्येक ऋतूत स्वीट कॉर्न चाट खायला तितकीच मजा असते. त्यात घालण्यात आलेले लोणी आणि त्याची चव आणखी अनोखी आहे.

साहित्य -

उकडलेले मक्याचे दाणे, लोणी, लाल तिखट, काळी मिरी पावडर, कांदा (Onion), टोमॅटो, लिंबाचा रस, शेव आणि कोथिंबीर .

कृती -

- प्रथम मक्याचे दाणे उकळवा आणि ते बाहेर काढा, एका प्लेटमध्ये ठेवा.

- आता गॅसवर तवा ठेवुन गरम झाल्यावर त्यात थोडं बटर टाका, त्यात उकडलेले मक्याचे दाणे घालून व्यवस्थित तळून घ्या.

- लक्षात ठेवा मध्यम आचेवर तळून घ्या नाहीतर दाणे जळू शकतात. आता एका प्लेटमध्ये तळलेले कॉर्न काढा आणि त्यात लाल तिखट, काळी मिरी पावडर, मीठ घाला.

- आता त्यात बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, मीठ, शेव आणि हिरवी कोथिंबीर घाला.

- या सर्व गोष्टींवर लिंबाचा रस घाला आणि चमच्याने व्यवस्थित मिसळा. स्वीट कॉर्न चाट सर्व्ह करण्यासाठी तयार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gadchiroli Crime: धक्कादायक! जादूटोणाच्या संशयातून गावकऱ्यांनी महिलेसह दोघांना जिवंत जाळलं

Maharashtra Politics: प्रणितीसह सुशीलकुमार शिंदे भाजपच्या वाटेवर? प्रकाश आंबेडकरांच्या दाव्याने खळबळ

MI vs KKR, IPL 2024: मुंबईचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात! घरच्या मैदानावर मुंबईचा KKR कडून लाजिरवाणा पराभव

Maharashtra Politics 2024 : पवारांनी गल्ली ते दिल्लीपर्यंत फोडला घाम; पश्चिम महाराष्ट्रात अस्तित्वासाठी संघर्ष

Baramati Politics: विधानसभेतही बारामतीत महाभारत, अजित पवार यांना पुतण्या युगेंद्र देणार आव्हान?

SCROLL FOR NEXT