Simple Veg Pulao Recipe : व्हेज पुलाव बनवायचा आहे तर, या साध्या पध्दतीने बनवा

या पध्दतीने बनवा व्हेज पुलाव
Simple Veg Pulao Recipe
Simple Veg Pulao RecipeSaam Tv
Published On

Simple Veg Pulao Recipe : बऱ्याचदा आपल्या घरी अचानक कोणी पाहुणे येतात आणि या पाहुण्याचा जेवून जाण्याचा बेत असतो. त्यामुळे अशावेळी अचानक काय जेवण बनावयाचे असा गोंधळ उडतो.

त्यासाठीच आज एक झटपट आणि टेस्टी होणाऱ्या रेसिपी पाहुयात. ही रेसिपी खायला खूप चविष्ट लागते आणि पाहुण्यांना खूप आवडेल, म्हणून अचानक जेवायला घरी आलेल्या पाहुण्यांसाठी झटपट आणि पटापट टेस्टी असा व्हेज पुलाव आपण बनवू शकतो.

Simple Veg Pulao Recipe
Matar Kulche Recipe : दिल्ली स्टाइलचे मटर कुल्चे बनवायचे आहे तर, आजच ट्राय करा

व्हेज पुलाव बनवण्यासाठी ३० मिनिटे लागतात. त्यात आपण आपल्या आवडीच्या सर्व भाज्या टाकू शकतो. या पुलावची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे ही एक अतिशय साधी व चविष्ट पाककृती आहे. मुलांना टिफिनमध्ये सुध्दा किंवा घरी कोणी पाहुणे आले तर आपण बनवून त्यांनाही देऊ शकतो. चला तर मग जाणून घेऊया कशी बनवायची ही रेसिपी.

साहित्य -

तूप, जिरे, दगडीफूल, चक्रीफूल, बडीशेप, दालचिनी, लवंग, तमालपत्र, काजू, कांदा, आले लसूण पेस्ट, मिरची, टोमॅटो, बटाटा, गाजर, मटार, फ्लॉवर, पनीर, बीन्स, कोथिंबीर आणि बारीक चिरलेला पुदिना, लिंबाचा रस, बासमती तांदूळ (Rice), मीठ आणि गरम मसाला

कृती -

Simple Veg Pulao Recipe
Paneer Chilli Recipe : हॉटेल सारखी पनीर चिल्लीची चव चाखायची आहे? झटपट बनेल

-प्रथम प्रेशर कुकरमध्ये तूप टाका आणि गरम झाल्यावर त्यात जिरे,चक्रीफुल, दालचिनी, लवंग, तमालपत्र टाका. यानंतर त्यात चिरलेला कांदा आले लसूण पेस्ट, मिरच्या घाला.

-आता थोडा वेळ भाजुन घ्या. नंतर त्यात टोमॅटो घालून व्यवस्थित परतून घ्या. आता भाज्या (बटाटे, गाजर, वाटाणे, फ्लॉवर, पनीर, बीन्स) घालून थोडा वेळ शिजवून घ्या.

- यानंतर त्यात पनीर, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि पुदिना, मीठ आणि गरम मसाला घालून थोडे परतून घ्या.

- शेवटी भिजवलेले तांदूळ, लिंबाचा रस आणि पाणी (Water) घाला. दोन शिट्ट्या झाल्यावर ते उतरवा. व्हेज पुलाव तयार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com