Infertility Counseling  Saam TV
लाईफस्टाईल

Infertility Counseling : महिन्याला १० जोडपी करताय वंध्यत्वाचा सामना, समुपदेशन ठरतेय फायदेशीर; जाणून घ्या कसे

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Couples Facing Fertility Problems :

जागतिक आरोग्य संघटनेच्या मते लैगिंग संबंध ठेवूनही गरोदर राहण्यास अपयश येत असल्यास ते जोडपे वंध्यत्वाने ग्रासलेलं आहे. बहुसंख्य जोडप्यांमध्ये या मानसिक त्रासातून जात असल्याचे समोर आले आहे.

ज्यामुळे उदासीनता, चिंताग्रस्त, तणावग्रस्त, नैराश्य आणि चिडचिड होणे सामान्यपणे या जोडप्यांमध्ये दिसून येते. दर महिन्याला ३० ते ३५ वयोगटालतील जवळपास १० जोडपी वंध्यत्वाचा सामना करताना दिसून आले आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मुंबईच्या नोव्हा आयव्हीएफ फर्टिलिटी येथील मनोविकार तज्ज्ञांनी स्पष्ट केले की, वंध्यत्वाचा सामना करणाऱ्या जोडप्यांनी या समस्येवर मात करण्यासाठी समुपदेशनाला प्राधान्य देणे गरजेचे आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार जगभरात सहा पैकी एका जोडप्याला वंध्यत्वाचा सामना करावा लागतो. हार्मोनल असंतुलन, प्रजननांचा विकार, प्रदूषण, अनुवांशिक आजार, धुम्रपान व मद्यपानासारख्या वाईट सवयी आणि मादक पदार्थांचा वापर यासारख्या कारणांमुळे पुरुष आणि स्त्रिया दोघांवरही त्याचा परिणाम होतो.

याव्यतिरिक्त जास्त वजन (Overweight) किंवा कमी वजनामुळे हार्मोनल संतुलन बिघडू शकते आणि ओव्हुलेशन किंवा शुक्राणूंच्या उत्पादनावर याचा परिणाम होतो. कीटकनाशके, विशिष्ट धातू किंवा किरणोत्सर्गासारख्या काही विषारी पदार्थांच्या संपर्कात आल्याने प्रजनन अवयवांचे नुकसान होऊ शकते किंवा हार्मोनल असंतुलनासारखी समस्या उद्भवू शकते. प्रजनन उपचारांमध्ये प्रगती झाली असूनही, गर्भधारणेबाबत वाढलेल्या सामाजिक अपेक्षांमुळे वंध्यत्वासारख्या समस्येला सामाजात अडचणी समजल्या जातात. एवढेच नाही तर वंध्यत्वामुळे जोडप्यांचे मानसिक स्वास्थ्य (Mental Health) देखील बिघडते.

नोव्हा आयव्हीएफ फर्टिलिटी मुंबईच्या केंद्रांमध्ये दर महिन्याला 30 ते 43 वयोगटातील 30 पैकी किमान 10 जोडपी वंध्यत्वाला तोंड देत आहे. पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांना अधिक मानसिक आणि भावनिक समस्यांना सामोरे जावे लागते. शिवाय या जोडप्यांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो जसे की आत्मविश्वास खालावणे, अयशस्वी आयव्हीएफ उपचारांमुळे उद्भवणारा ताण, मागील अपयशांमुळे आलेले दडपण आणि यामुळे नातेसंबंधातही (Relation) अडचणी उद्भवतो.

60% जोडपी भीतीमुळे वंध्यत्वाच्या संघर्षांबद्दल त्यांच्या जोडीदाराशी चर्चा करणे टाळतात. उरलेली 40% जोडपी ही कौटुंबिक किंवा मैत्रीपूर्ण संबंधांतून आपली समस्या समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवित असल्याचे डायना क्रस्टा(मुख्य मानसोपचार तज्ज्ञ,नोव्हा आयव्हीएफ फर्टिलिटी) यांनी व्यक्त केली.

डायना क्रस्टा, पुढे सांगतात की, वंध्यत्व हे प्रामुख्याने शारीरिक आरोग्यावर परिणाम करते. गर्भधारणेसंबंधीत समस्येचा सामना करताना जोडप्यांना भावनिक समस्यांना सामोरे जावे लागते. पालक म्हणून एखाद्याच्या योग्यतेबद्दल सतत प्रश्न विचारल्यामुळे दुःख आणि निराशेची खोल भावना येऊ शकते. प्रजनन क्षमतेच्या आव्हानांना तोंड देत असलेले जोडपे एकमेकांपासून दूर जात असल्याचे दिसून येऊ शकते कारण ते स्वतःला दोष देतात आणि गर्भधारणेसाठी संघर्ष करतात.

वंध्यत्वाचा अनुभव घेणाऱ्या जोडप्यांनी योग्य-संतुलित आहाराचे पालन करणे, दररोज व्यायाम करणे, योग आणि ध्यान यांसारख्या विश्रांती तंत्रांचा पर्याय निवडणे, स्वत: ची काळजी घेणे, स्वत: च्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे असे डॉ स्नेहा साठे(वंध्यत्व निवारण तज्ज्ञ,नोव्हा आयव्हीएफ फर्टिलिटी,चेंबूर) यांनी स्पष्ट केले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today Horoscope : जुना अबोला मिटेल,घरात उत्साहाचे वातावरण राहील; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today : आज विनाकारण शत्रुत्व ओढवून घ्याल, दानधर्मासाठी खर्च कराल; वाचा तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

Fact Check : गणपतीसारख्या दिसणाऱ्या बाळाचा जन्म? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

Maharashtra Politics: महायुतीचं बेताल त्रिकूट; देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याला नेत्यांकडून हरताळ

Save Mangroves : कांदळवन सुरक्षेसाठी १२० कोटी; १९५ ठिकाणं, ६६९ CCTV कॅमेरे, सरकारचा प्लान की पांढरा हत्ती?

SCROLL FOR NEXT