Phone Buying Tips : फोन विकत घेताना या गोष्टींची काळजी घ्या, दुर्लक्ष केल्यास पैसे जातील पाण्यात...

Things To Know Before Buying A New Smartphone : आज आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स देणार आहोत ज्या फोन खरेदी करण्यापूर्वी चेक करायला पाहिजे.
Phone Buying Tips
Phone Buying TipsSaam Tv
Published On

Smartphone Buying Guide :

हल्ली बाजारात अनेक नवीन फीचरर्सचे स्मार्टफोन लॉन्च होत असतात. दसरा दिवाळी किंवा ऑफर्सच्या काळात फोन खरेदी करण्याचा ट्रेंड वाढता दिसून येत आहे. स्मार्टफोन विकत घेताना आपण त्याची बॅटरी, कॅमेरा, प्रोसेसर आदी गोष्टींकडे लक्ष देतो.

परंतु, तुम्हाला माहित आहे का? स्मार्टफोनच्या फीचर्ससोबत त्याच्या इतर स्पेसिफेकेशन्स देखील आहेत ज्याकडे आपण दुर्लक्ष करतो. ज्यामुळे तो व्यवस्थित वापरता येत नाही आणि पैसे देखील अधिक खर्च होतात. त्यासाठी आज आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स देणार आहोत ज्या फोन खरेदी करण्यापूर्वी चेक करायला पाहिजे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

1. SAR मूल्य

कोणत्याही मोबाइल (Mobile) फोनचे रेडिएशन SAR द्वारे मोजता येते. फोनचे SAR मूल्य जितके जास्त असेल तितकाच तो अधिक धोकादायक असतो. भारतात (India) विकल्या जाणाऱ्या फोनमध्ये SAR मूल्य हे 1.6 वॅट्स प्रति किलोग्रॅम असते. जर तुम्हाला तुमच्या फोनचे SAR चेक करायचे असेल तर *#07# डायल करुन त्याचे SAR मूल्य तपासता येते. जर SAR यापेक्षा जास्त असेल तर तो फोन अधिक धोकादायक समजला जातो.

2. फोन रिफ्रेश रेटचा रिफ्रेश दर

बहुतेकांना फोनच्या स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशनबद्दल माहित असते. परंतु, खूप कमी लोकांना त्याच्या रीफ्रेशदराबद्दल माहित नसते. रिफ्रेश रेट स्मार्टफोनच्या डिस्प्लेचा वेग दाखवतो. रिफ्रेश रेट तुमचा फोन किती स्पीडने काम करतो याविषयी माहिती देतो. जेव्हा तुम्ही एंट्री लेव्हल स्मार्टफोन खरेदी करता तेव्हा त्याचा रिफ्रेश दर 60 ते 90 Hz दरम्यान असतो. जेव्हा तुम्हाला मिड-रेंज किंवा प्रीमियम स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तेव्हा त्याचा रिफ्रेश रेट 90 ते 120 Hz असणे आवश्यक आहे. सध्या यापेक्षा जास्त रिफ्रेश रेट असणारे फोन बाजारात उपलब्ध आहेत. परंतु बहुतेक स्मार्टफोन 120 Hz सह बाजारात (Market) मिळतात. जर तुम्हाला मिड रेंज किंवा प्रीमियम स्मार्टफोन खरेदी करत असाल तर किमान 90 Hz चा स्मार्टफोन खरेदी करा.

Phone Buying Tips
Most Dangerous Fort In Pune : डोळ्यांना स्वर्गसुख देणारा पुण्यातील चित्तथरारक किल्ला, निसर्गाचं सौंदर्य पाहून ट्रेकर्सप्रेमींना भूरळ!

3. चार्जिंग सपोर्ट

तुम्ही मिंड रेज किंवा प्रीमियम स्मार्टफोन खरेदी करत असाल तर तुम्हाला किमान 60 ते 80 वॅट्सचा चार्जिंग सपोर्ट असलेला स्मार्टफोन खरेदी करण्याचा प्रयत्न करा. यापेक्षा कमी वॅट्सचा चार्जिंग सपोर्ट फोन चार्ज करण्यासाठी १ ते दीड तास घेतो. यामध्ये 60 ते 80 वॅट्सचा चार्जिंग सपोर्ट असलेला फोन अर्धा तास किंवा पाऊण तासात पूर्ण चार्ज होतो.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com