Sleeping Issue : अपुऱ्या झोपेमुळे तरुणांमध्ये उद्भवते हायपरटेन्शनची समस्या, वेळीच घ्या काळजी; अन्यथा...

Hypertension Causes : कमी झोपेमुळे रक्तदाबाच्या समस्यांचा सामना करावा लागतो.
Sleeping Issue
Sleeping IssueSaam Tv
Published On

Hypertension Due To Insufficient Sleep:

बदलत्या जीवनशैलीमुळे खाण्यापिण्याच्या बदलेल्या सवयी आणि अपुऱ्या झोपेच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. कमी झोपेमुळे रक्तदाबाच्या समस्यांचा सामना करावा लागतो.

पुण्यातील अपोलो स्पेक्ट्रा इंटरनल मेडिसिन एक्सपर्टचे डॉ. सम्राट शहा, म्हणाले की, तज्ज्ञ डॉक्टरांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार, जे लोक झोप घेत नाही. किंवा जे लोक अपुऱ्या झोपेच्या समस्यांमुळे त्रस्त आहेत त्यांना उच्च रक्तदाबाचा सामना करावा लागतो. अपुऱ्या झोपेमुळे रक्तवाहिन्यांच्या कार्यात अडथळा निर्माण होतो. ज्यामुळे त्याची लवचिकता कमी होऊन आकुंचन पावण्याची शक्यता वाढते. त्यामुळे रक्तप्रवाहात अडथळा निर्माण होतो आणि संपूर्ण शरीरात ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी हृदयाला अधिक मेहनत घ्यावी लागते. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

तसेच औषधांशिवाय (Medicine) उच्च रक्तदाब कमी होत नाही. गाढ झोपेमुळे आपले शरीर रक्तवाहिन्यांच्या कार्यातील अडथळे दूर करतात ज्यामुळे हार्मोनल संतुलन राखले जाते. नियमित पुरेशा प्रमाणात झोप घेतल्यास उच्च रक्तदाबाचा (Hypertension) धोका कमी होतो. जाणून घेऊया या आजारात काळजी कशी घ्यायला हवी ते.

1. रात्रीच्या वेळी शांत झोप येण्यासाठी काय कराल?

  • झोपण्याची (Sleep) वेळ निश्चित करा. तसेच सोशल मीडिया, टीव्ही, मोबाइलचा वापर शक्यतो टाळा. पुस्तक वाचणे, ध्यान करणे किंवा दीर्घ श्वासोच्छवासाचा व्यायाम करा.

  • झोपण्यापूर्वी गरम पाण्याने आंघोळ करा. तसेच झोपण्यापूर्वी किमान ३० मिनिटे आधी ध्यान करा. ज्यामुळे चांगले वातावरण निर्माण होईल.

  • झोपेमध्ये व्यत्यय येत असल्यास काळजी घ्या. नियमित व्यायाम केल्याने झोप चांगली लागते. परंतु, झोपण्यापूर्वी व्यायाम करणे टाळावे. जॉगिंग करा किंवा जीममध्ये जा. रात्रीच्या वेळी कॅफिनयुक्त पेयांचा वापर करणे टाळा.

Sleeping Issue
Phone Buying Tips : फोन विकत घेताना या गोष्टींची काळजी घ्या, दुर्लक्ष केल्यास पैसे जातील पाण्यात...
  • अपुरी झोप आणि उच्च रक्तदाब यांच्यातील फरक ओळखून संपूर्ण हृदय आणि रक्तवाहिन्यांसंबंधी आरोग्य उत्तम राखण्यासाठी झोपेच्या सवयींकडे लक्ष द्या.

  • रात्रीच्या वेळी पुरेशी विश्रांती घेतल्यास दिवसाची सुरुवात चांगली होईल. तसेच गंभीर समस्यांपासून सुटका होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com