आईवडिलांना वाटतं की, आपली मुले इंटरनेटवर अभ्यास करत आहेत. प्रत्यक्षात मात्र तसं नाहीये, इंटरनेटचा वापर अभ्यास कमी आणि इतर गोष्टींसाठी जास्त केला जात असल्याची माहिती समोर आली आहे. भारत देश ऑनलाइन शिक्षणाच्या बाबतीत मागे आहे, असं इंटरनेट आणि मोबाइल असोसिएशन ऑफ इंडियाच्या म्हणजेच IAMAI च्या 2023 च्या अहवालानुसार स्पष्ट झालं (Student Internet Activities) आहे. (latest marathi news)
अहवालानुसार, भारतात सर्वात मजेदार गोष्टी ऑनलाइन पाहिल्या जात आहेत. अहवालानुसार, भारतातील सुमारे 86 टक्के लोक इंटरनेटवर व्हिडिओ, ऑडिओ आणि ओटीटी ॲप्सचा आनंद (IAMAI Report) घेतात. सर्वाधिक मनोरंजनाचे व्हिडिओ खेड्यांमध्ये ऑनलाइन पाहिले जातात. ग्रामीण भारतात सुमारे 53 टक्के लोक व्हिडिओ, ऑडिओ आणि ओटीटी ॲप्स वापरतात. मेट्रो शहरांमध्ये हे प्रमाण 15 टक्क्यांपर्यंत आहे. छोट्या शहरांमध्ये हा आकडा 23 टक्के आहे, तर केवळ 3 टक्के लोक ऑनलाइन अभ्यास करतात.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
भारतीय इंटरनेटवर काय पाहतात?
51 टक्के भारतीय संवादासाठी म्हणजेच एखाद्याशी बोलण्यासाठी इंटरनेटचा वापर करत असल्याचं समोर आलं आहे. यातही खेड्यातच जास्त वापर केला जात असल्याचं स्पष्ट झालं (Indians Top Internet Activities) आहे. लहान शहरे आणि मेट्रो शहरातील लोकं कमी ऑनलाइन संवाद साधतात. भारतात 70 टक्के लोक इंटरनेटवर सोशल मीडिया वापरतात. यामध्येही गावातील लोकांची संख्या जास्त आहे.
केवळ 53 टक्के भारतीय ऑनलाइन गेमिंग करतात. इंटरनेटद्वारे निव्वळ व्यापार करणारे भारतीय 52 टक्के आहेत. याशिवाय ४५ टक्के भारतीय इंटरनेटद्वारे डिजिटल पेमेंट करतात. तर ऑनलाइन सुरू करणाऱ्यांचे प्रमाण केवळ ३ टक्के (Top Internet Activities) आहे.
इंटरनेटचा वापर करणाऱ्या भारतीयांची संख्या (Internet Activities In India)
भारतातील इंटरनेट वापरकर्ते - 707 दशलक्ष
OTT, व्हिडिओ, ऑडिओ - 621 दशलक्ष
संवाद - 575 दशलक्ष
सोशल मीडिया - 438 दशलक्ष
ऑनलाइन गेमिंग - 427 दशलक्ष
नेट कॉमर्स - 427 दशलक्ष डिजिटल पेमेंट - 370 दशलक्ष
ऑनलाइन शिक्षण – 24 दशलक्ष
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.