missed train with confirmed ticket refund rules Indian Railways saam tv
लाईफस्टाईल

तिकीट कन्फर्म पण एक मिनिटांनी ट्रेन सुटली, तर रिफंड मिळतो का? रेल्वेचे नियम जाणून घ्या

Indian Railways Refund: कन्फर्म तिकीट असून ट्रेन चुकली तर रिफंड मिळतो का? सध्याच्या IRCTC नियमांनुसार कन्फर्म तिकीटासाठी ट्रेन सुटण्याच्या नियोजित वेळेच्या किमान ४ तास आधी तिकीट रद्द किंवा ऑनलाइन TDR दाखल न केल्यास रिफंड मिळत नाही.

Bharat Jadhav

समजा तुम्ही एका हातात बॅग आणि दुसऱ्या हातात फोन घेऊन तुम्ही स्टेशनच्या पायऱ्या चढून आलात. पण प्लॅटफॉर्मवर पोहोचताच तुमची ट्रेन निघून गेली.किती मनाला वेदना होतात ना. मग तुमच्या खिशात एक महागडे आणि 'कन्फर्म' तिकीट असूनही तुमची ट्रेन निघून गेली तर डोक्यावर हात ठेवण्याची वेळ येत असते. असा प्रसंग तुमच्यासोबत घडला असेल तर तुमच्या डोक्यात विचार येतो की, "माझे सर्व पैसे वाया गेले का? मला रिफंड देईल का? रेल्वेच्या रिफंडचे नियम काय हे जाणून घ्या.

स्वतःच्या उशिरामुळे तुमची ट्रेन सुटली तर काय होते?

जर तुम्ही स्टेशनवर उशिरा पोहोचलात किंवा इतर कोणत्याही वैयक्तिक कारणामुळे तुमची ट्रेन सुटली, तर रेल्वेकडून रिफंड दिला जात नाही. सामान्य परिस्थितीत, ट्रेन सुटल्यानंतर परताव्याची मागणी करता येत नाही. IRCTC चा स्पष्ट नियम आहे की, कन्फर्म ई-तिकिटाचे पैसे परत रिफंड मिळवण्यासाठी, निश्चित कालावधीत तिकीट रद्द करणे. ऑनलाइन TDR दाखल करणे अनिवार्य आहे. नियमांनुसार, कन्फर्म तिकिटांसाठी ही रद्द करण्याची प्रक्रिया रेल्वेच्या नियोजित सुटण्याच्या वेळेच्या किमान चार तास आधी पूर्ण करणे आवश्यक आहे

शेवटच्या क्षणी तिकीट रद्द करण्याऐवजी वेळेत रद्द करा

जर तुम्हाला प्रवासाला जाता येणार नाही याची जाणीव आधीच झाली, तर वेळेत तिकीट रद्द करणे, शहाणपणाचे ठरेल. तिकीट रद्द करण्याचे शुल्क हे प्रवासाच्या वेळेच्या किती आधी तिकीट रद्द केले जाते, यावर अवलंबून असते.

४८ तासांपेक्षा जास्त आधी: जर प्रवासाच्या नियोजित वेळेच्या ४८ तास किंवा त्याहून अधिक आधी तिकीट रद्द केले, तर भाड्यातून केवळ एक निश्चित किमान शुल्क कापले जाते.

१२ ते ४८ तासांच्या दरम्यान: जर तुम्ही प्रवासाच्या वेळेपूर्वी १२ ते ४८ तासांच्या दरम्यान तिकीट रद्द केले, तर एकूण भाड्याच्या २५% पर्यंत रक्कम कापली जाऊ शकते.

४ ते १२ तासांच्या दरम्यान: जर गाडी सुटण्याच्या नियोजित वेळेच्या ४ ते १२ तास आधी तिकीट रद्द केले, तर भाड्याच्या ५० टक्के पर्यंतची रक्कम रद्द करण्याचे शुल्क (कॅन्सलेशन चार्ज) म्हणून कापली जात असते.

जेव्हा गाडी ३ तासांपेक्षा जास्त उशिरा असते

जर तुमची गाडी ज्या स्थानकावरून तुम्हाला चढायचे आहे, तिथेच ३ तासांपेक्षा जास्त उशिरा येत असेल, तर परताव्याचे (रिफंडचे) नियम पूर्णपणे बदलतात. अशा परिस्थितीत जर तुम्ही तुमचा प्रवास रद्द करण्याचा निर्णय घेतला, तर तुम्हाला तिकिटाच्या रकमेचा पूर्ण परतावा मिळू शकतो. मात्र यासाठी मुख्य अट अशी आहे की, गाडी प्रत्यक्ष सुटण्यापूर्वी तुम्हाला ऑनलाइन TDR दाखल करणे आवश्यक आहे. तुमच्या PNR वर नमूद असलेल्या कोणत्याही प्रवाशाने त्या गाडीतून प्रवास केलेला नसावा.

चार्ट तयार झाल्यानंतरची ई-तिकिटे आणि तत्काल तिकिटांबाबतचे नियम

रेल्वेचा चार्ट तयार झाल्यानंतर तुम्ही सामान्य प्रक्रियेद्वारे ई-तिकीट रद्द करू शकत नाही. जर तुमचे प्रकरण रेल्वेच्या परतावा (रिफंड) नियमांच्या कक्षेत येत असेल, तर ऑनलाइन TDR दाखल करणे हाच एकमेव पर्याय उरतो. निश्चित तत्काल तिकिटांच्या बाबतीत सांगायचे तर, सामान्यतः तिकीट रद्द केल्यावर रिफंड दिला जात नाही. ज्या गाडीसाठी तुम्ही तत्काल तिकीट काढले होते ती गाडी तुमची चुकली, तर परतावा मिळवणे शक्य नसते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Tips : ऑफिसमध्ये काम करताना सतत झोप येते? यामागे असू शकतात ही ७ कारणं

नवरा-बायकोचं नातं मजबूत ठेवण्यासाठी रोज करा या 7 गोष्टी

Maharashtra News Live Update: नवी मुंबई क्लस्टर योजनेवर गणेश नाईक यांचे ताशेरे

Sugar Avoid: वजन कमी करण्यासाठी साखर खाणं कमी करायची आहे? मग फॉलो करा 'या' ७ सोप्या टिप्स

Pasta Recipe : रेस्टॉरंट स्टाईल घरच्या घरी बनवा बिना मैदा क्रिमी पास्ता! 'या' ट्रिक्स फॉलो करून करा

SCROLL FOR NEXT