Manasvi Choudhary
भेंडी ही अनेकांच्या आवडीची भाजी आहे. लहानांपासून ते मोठ्यापर्यंत सर्वजण आवडीने भेंडीची भाजी खातात.
आजकाल अनेकजण निरोगी आरोग्यासाठी भेंडीचे पाणी देखील पितात. भेंडीचे पाणी प्यायल्याने शरीरात अनेक बदल होतात. सलग 6 महिने तुम्ही भेंडीचे पाणी प्यायल्याने शरीराला काय फायदा होतो ते जाणून घ्या.
भेंडीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते. हे फायबर शरीरातील एलडीएल म्हणजेच खराब कोलेस्ट्रॉल बाहेर टाकण्यास मदत करते. तसेच रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी फायदेशीर आहे.
ज्या लोकांना मधुमेह आहे, त्यांच्यासाठी भेंडीचे पाणी पिणे अत्यंत फायदेशीर मानले जाते. या पाण्यामुळे शरीरातील इन्सुलिनची कार्यक्षमता सुधारण्यास मदत होते.
भेंडीच्या फायबर असतात, ज्यामुळे सकाळी हे पाणी प्यायल्याने पोट दीर्घकाळ भरल्यासारखे वाटते. यामुळे वजन नियंत्रणात राहते.
ज्या लोकांना किडनी स्टोनचा त्रास आहे, त्यांनी भेंडी किंवा त्याचे पाणी पिणे टाळावे.
भेंडीचे पाणी बनवण्यासाठी २ ते ३ ताज्या भेंडी स्वच्छ धुवून घ्या. नतर भेंडीचे दोन्ही टोके कापून उभ्या चीरा. एका ग्लासमध्ये पाण्यात उभी चिरलेली भेंडी ४ ते ५ तास भिजत ठेवा. भेंडीचे पाणी तयार होईल.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.